National Prerna Doot Award: गोव्याचा विशाल फुटाणेकर 'प्रेरणादायी राजदूत'; बिहारच्या छपरा येथे मिळाला पुरस्कार

Vishal Phutanekar: बिहारमधील छपरा येथील ऐतिहासिक भिखारी ठाकूर सभागृहात 'राष्ट्रीय प्रेरणादूत पुरस्कार' सोहळा आयोजित करण्यात आला होता.
National Prerna Doot Award
National Prerna Doot AwardDainik Gomantak
Published on
Updated on

National Prerna Doot Award

पणजी: गोव्याच्या विशाल नामदेव फुटाणेकर याला समाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल २०२४-२५ या वर्षासाठी 'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं आहे.

बिहारमधील छपरा येथील ऐतिहासिक भिखारी ठाकूर सभागृहात 'राष्ट्रीय प्रेरणादूत पुरस्कार' सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभरातील ३० तरुणांना समाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं.

यात गोव्याच्या विशाल नामदेव फुटाणेकर याला 'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. त्याला रौप्य पदक आणि पुरस्काराचं प्रमाणपत्र मिळालं.

National Prerna Doot Award
ISL 2024-25: पराभव विसरून FC Goa मैदान मारणार का? 'प्ले-ऑफ'च्या आशेसाठी ओडिशालाही विजयाची गरज

राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कार कोणाला दिला जातो?

'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कार' हा भारतातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो.

हा पुरस्कार देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी दिला जातो. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा 'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्काराचा उद्देश आहे.

कोणा-कोणाला मिळाला पुरस्कार?

हिमाचल प्रदेशातील दीक्षा वशिष्ठ, संचिता चक्रवर्ती, पश्चिम बंगालमधील दीपा देवनाथ, मनीष कुमार, वीणा चौधरी, श्रियान शर्मा, अंकुश बिस्वास, गुरुपाद गदाई, यशिका शर्मा, बिहारमधील हेमंत नायक, केरळमधील पार्वती, रेवती वन, उत्तराखंडमधील प्रखर सिंग पाल, त्रिपुरामधील नेपाळ चंद्र सरकार, तामिळनाडूमधील उदय कुमार जी, गुजरातमधील हर्षा शुक्ला गोव्यातून विशाल नामदेव फुटाणेकर याला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

National Prerna Doot Award
Goa Assembly Winter Session: सरकारच्या ‘परीक्षेत’ विरोधकांचा लागणार ‘कस’, राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार अधिवेशनाची सुरवात

महाराष्ट्रातील शिखा सिंग लबाना, ओडिशामधील शंभू व्हीसी, कर्नाटकमधील उबास पीयू, उत्तर प्रदेशातील आलोक पटेल, अशरफ अली, बिहारमधील दिल्लू सिंग, आनंद अंकित, कर्नाटकमधील अजवैन एम ए, मध्य प्रदेशातील मान्यता द्विवेदी, मध्य प्रदेशातील रवी रंगरेझ, पश्चिम बंगालमधील तिथी गोस्वामी यांना 'राष्ट्रीय प्रेरणा दूत पुरस्कार'नं सन्मानित करण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com