Goa Villa Scam: आलीशान व्हिलाचे फोटो, तरुणींचं कॉल सेंटर; गोव्यात 500 पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांची 'मोडस ऑपरेंडी'

Goa Police: आरोपी हे काही काळासाठी गोव्यात राहिले होते आणि त्यांना गोव्यातील व्यवसायाची माहिती होती. याच आधारे त्यांनी हैदराबादमध्ये बसून ग्राहकांची फसवणूक केली. गोवा पोलिसांनी या टोळीची रवानगी तुरुंगात केलीये.
Goa Villa
Goa Villa Dainik Gomntak
Published on
Updated on

Goa Villa Scam Case

पणजी : परदेशातील व्हिलाचे फोटो पाठवून गोव्यात पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नामांकित वेबसाईटवर आलीशान व्हिलाचे फोटो टाकून ग्राहकांकडून आगाऊ रक्कम स्वीकारायचे आणि पर्यटक व्हिलाच्या पत्त्यावर पोहोचले की तिथे व्हिलाच नसायचा. अशा पद्धतीने या टोळीने किमान 500 पर्यकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदीगडमधील एका तरुणाची फसवणूक झाल्यानंतर त्याने गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या टोळीचे बिंग फुटले.

चंदीगड येथील रहिवासी पंकज धीमान या तरुणाने एका नामांकित वेबसाईटद्वारे 'रुबी व्हिला'चे बुकिंग केले. बुकिंगसाठीचे आर्थिक व्यवहार हे वेबसाईट मार्फत झाले नव्हते. वेबसाईटवर एक मोबाईल क्रमांक होता त्यावर फोन केल्यानंतर बुकिंगसाठी पूर्ण रक्कम आगाऊ (Advance) भरावी लागेल असे पंकजला सांगण्यात आले. ठरल्यानुसार पंकजने 20,000 रुपये ऑनलाइन पाठवून दिले. पंकज गोव्यातील दिलेल्या पत्त्यावर पोहोचला तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे व्हिला नव्हता. शेवटी त्याने गोवा पोलिसांकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली.

हणजून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असता घोटाळ्याची व्याप्तीही मोठी असल्याचे उघडकीस आले. ही टोळी 2022 पासून सक्रीय होती. या टोळीने युट्यूबवरून परदेशातील आलीशान व्हिलाचे फोटो शोधले आणि ते फोटो नामांकित बुकिंग वेबसाईटवर टाकले. गोव्यातील व्हिला असल्याचे भासवत ही टोळी पर्यटकांना गंडा घालायची.

Goa Villa
Goa Hotel: 'माझी गर्लफ्रेंड हॉटेलच्या स्वच्छतागृहात गेली अन्....', गोव्यातील धक्कादायक अनुभव, पोस्ट Viral

हैदराबादमध्ये कॉल सेंटर

आरोपी हे काही काळासाठी गोव्यात राहिले होते आणि त्यांना गोव्यातील व्यवसायाची माहिती होती. याच आधारे त्यांनी हैदराबादमध्ये बसून ग्राहकांची फसवणूक केली. त्यांनी हैदराबादमध्ये एका छोट्या खोलीत कॉल सेंटरसारखे दुकान थाटले. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी तरुणींची नियुक्ती केली. वेबसाईटवर Unverified Property मध्ये या टोळीने व्हिलाचे फोटो अपलोड केले होते.

'गोव्यात स्वस्तात आलीशान व्हिला'

नामांकित वेबसाईटवर आलीशान व्हिलाचे फोटो टाकायचे पण किंमती मात्र कमी ठेवायच्या, असा या टोळीचा पॅटर्न होता. ग्राहकाने वेबसाईटवरील फोटो पाहून फोन केला की त्याला असे भासवायचे की ही डील आजच्या दिवसासाठीच मर्यादित आहे, आत्ता बुकिंग नाही केले तर हा व्हिला दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल, असे ग्राहकांना सांगितले जायचे. काही ग्राहकांकडून 10 हजार तर काही ग्राहकांकडून 20 हजार रुपये घेण्यात आले होते. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम Advance मागितली जायची आणि ग्राहकही पैसे पाठवून द्यायचे.

व्हिला स्कॅमप्रकरणातील आरोपी कोण आहेत? (Goa Villa Case Accused)

पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना हैदराबादमधूल तर एकाला जयपूरमधून अटक केली. सय्यद अली मुख्तार, मोहम्मद फिरोझ, मोहम्मद अझरुद्दीन सैफ, सौरभ अशी या आरोपींची नावे आहेत. भारतीय दंड संहित २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किमान 500 जणांची फसवणूक केल्याचा संशय आहे, सविस्तर तपासानंतरच नेमक्या किती जणांची फसवणूक झाली, फसवणुकीची रक्कम याचे आकडे समोर येतील, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी माध्यमांना दिली.

Goa Villa
Goa Tourism: ‘लडकी नही तो आन्टी भी है...’; गोव्यात दलालांचा विळखा, 'दैनिक गोमन्तक'च्या प्रतिनिधीचा Ground Report

आरोपी रडारवर का आले नाहीत?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किमान 500 हून अधिक पर्यटकांच्या संपर्कात होते. यातल्या नेमक्या किती जणांनी आरोपींना पैसे पाठवले होते हे अद्याप समजलेले नाही. बुकिंगची रक्कमही फार मोठी नसल्याने फसवणूक झालेल्या पर्यटकांनी पोलिसांकडे तक्रारची दिली नाही, यामुळे आरोपी ऐवढी वर्ष पोलिसांच्या रडारवर आले नाहीत. ऑनलाइन व्यवहारांमधून आलेले पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com