Porvorim News इंटरनेट व तंत्रज्ञानाने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणला आहे. पुढील काळाची गरज ओळखून शिक्षण क्षेत्रात आवश्यक बदल केले पाहिजेत.
जे जे अद्ययावत त्याचा स्वीकार व कालबाह्य गोष्टींना नकार हा आजच्या काळातील मंत्र आहे,असे प्रतिपादन कॅनेटो समूहाचे संस्थापक व्यवस्थापक शेखर प्रभुदेसाई यांनी केले.
विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या शपथ ग्रहण समारंभ व विविध उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. भूषण भावे,प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. उज्वला हणजूणकर, विद्यार्थी मंडळाचे संयोजक दर्शन कांदोळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी कालिदास म्हामल, निसर्ग क्लबचे संयोजक डॉ. उद्धव पोळ, रेड रिबन क्लबचे डॉ. शैलेश चोडणकर,विद्यार्थी मंडळाचे सरचिटणीस,दर्पण नाईक, सांस्कृतिक सचिव, वंशिका नाईक, क्रीडा सचिव निकिता पार्सेकर, महिला प्रतिनिधी आंचल नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्या चारी हिने ईशस्तवन सादर केले. प्राचार्य भूषण भावे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रा.दर्शन कांदोळकर यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी मंडळाला शपथ दिली.प्रा.डॉ. पिंकेश दाबोळकर यांनी शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शपथ दिली.
बीए बीएड व वाणिज्य शाखेतील सर्वप्रथम आलेल्या सुविद्या नाईक, प्राजक्ता गांवकर, गायत्री कामत. निशा नार्वेकर या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा तारी व दीक्षा तळावलीकर यांनी केले. दर्पण नाईक यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.