Varca Beach: 24 तासांत वाळूचे पट्टे पूर्वस्‍थितीत, स्‍थानिक पंचायतीची यशस्वी मोहिम

अज्ञाताने केले होते दुष्कृत्य
Varca Beach
Varca BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Varca Beach वार्का समुद्रकिनारी जाण्यासाठी असलेल्‍या वाटेवरचा वाळूचा पट्टा कापून रस्‍ता तयार केल्‍याचे काम उघडकीस आल्‍यानंतर आज स्‍थानिक पंचायतीने पोकलेन वापरून ही कापून काढलेली वाळू पुन्हा पूर्वस्‍थितीत आणण्‍याचे काम सुरू केले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हे बेकायदेशीर काम केले होते.

Varca Beach
Railway Theft: रेल्वेत दोन चोरीच्या घटना

कालच वार्काच्‍या ग्रामस्थांनी ही बाब पंचायत मंडळाच्या निदर्शनास आणून दिली होती. यासंबंधी पत्रकारांशी बोलताना बाणावलीचे आमदार वेन्‍झी व्‍हिएगस यांनी पंचायतीचे या कामाबद्दल कौतुक केले.

ते म्हणाले गोव्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या पंचायतीने तक्रारीनंतर 24 तासांत वाळूचे पट्टे पूर्वस्‍थितीत आणण्‍याचे काम हाती घेतले असावे.

Varca Beach
Bicholim Dengue Case: म्हापश्या पाठोपाठ डिचोलीत ‘डेंग्यू’ची साथ, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

वार्का पंचायतीने या कामातून लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे आणि आपण विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता, असेही त्‍यांनी सांगितले. पंचसदस्‍य रोलंड फर्नांडिस म्हणाले, आम्ही सर्व संबंधित विभागांशी संपर्क साधून हे काम सुरू केले आहे. जे घडले ते पर्यावरणाला हानीकारक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

B L Santosh Visit Goa
Electric Shock Death Goa
adv rohit bras de sa amicus curiae
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com