Vasco Crime: परेरा यांना अटक न झाल्यास गोवा बंद करु- शिवप्रेमींचा इशारा

शुक्रवारी रात्री 1 पर्यंत पोलिस स्थानकावर समोर होता ठिय्या
Fr Bolmax Pereira
Fr Bolmax Pereira Dainik Gomantak
Published on
Updated on

Vasco Crime छत्रपती शिवरायांसंबंधी अपमानजनक टिपण्णी करून हिंदूधर्मीय तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या कारणासाठी फादर बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम २९५, ५०४ खाली वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला, पण त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू आणि त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. परेरा यांना अटक न झाल्यास आम्ही गोवा बंदही करु, असे शिवप्रेमी किरण नाईक यांनी म्हटले आहे.

वास्को पोलिस स्थानकासमोर शुक्रवारी रात्री १ वाजेपर्यंत शिवप्रेमींनी आंदोलन केले होते. त्यांनतर ते माघारी परतले. येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यामुळे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. फा. परेरा यांनी छ. शिवाजी महाराज हे दैवत नसून एक ''नॅशनल हिरो'' असल्याचे वक्तव्य चिखली चर्चमध्ये धर्मोपदेशन करताना केले होते. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत.

Fr Bolmax Pereira
Mapusa Crime: पंचसदस्याजवळील बंदूक जप्त करून संशयितास अटक करा- फिर्यादीच्या कुटुंबियांची मागणी

अपशब्द काढणाऱ्यांवर कारवाई करा

चर्चच्या पाद्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले, हे चुकीचे असून संबंधितांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवातर्फे करण्यात आली आहे.

अभाविप गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून स्वधर्मरक्षणाचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत.

गोव्यात ज्यापद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेळोवेळी अवमान करण्याचे काम केले जात आहे, ते कदापि सहन केले जाणार नाही. उत्तर गोवा जिल्हा संयोजक सुदिप नाईक म्हणाले, समाजात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी सरकारने कडक निर्बंध घातले पाहिजे.

Fr Bolmax Pereira
Goa BJP: खासदार सदानंद शेट तानावडे पक्ष कार्यात व्यस्त, दिल्लीहून येताच राज्यात बैठकांचा सपाटा सुरू

अतिशय खेदजनक!

आमदार संकल्प आमोणकर म्हणाले, सांप्रदायिक सद्‍भावना बिघडवणाऱ्या धार्मिक बाबींवर विधाने केली जातात, हे अतिशय खेदजनक आहे. पण सरकार परिस्थिती हाताळेल, असा पूर्ण विश्वास आहे. मी लोकांना आवाहन करतो, की त्यांनी कोणत्याही धार्मिक मुद्द्यावर विधाने करू नयेत आणि जातीय सलोख्याने शांततेने जगावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com