Mapusa Crime म्हापसा- हळदोणा पंचसदस्य प्रणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कामगारांनी २३ वर्षीय युवकाला मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील संशयित नाईक हे फरार असून पोलिसांनी त्यांना अटक करावी. याशिवाय संशयिताने फिर्यादीवर रोखलेली ती बंदूक जप्त करावी, अशी मागणी फिर्यादीसह त्यांचे कुटुंब व मित्रपरिवारांनी केली.
शनिवारी (ता. ५) म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फिर्यादी स्वप्निल पेडणेकर, अमर मांद्रेकर, माजी पंचसदस्य थॉमस अल्वारिस आदी उपस्थित होते.
फिर्यादी स्वप्नील पेडणेकर म्हणाले, ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. यातील तिघांना अटक झाली असून फरार संशयितास पोलिसांनी अटक करावी. संशयित पंचसदस्य यांच्याशी आपले काहीच पूर्ववैमनस्य किंवा वाद नाही.
तरीही अकारण त्यांनी मारहाण करीत मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी माझ्यावर बंदूक रोखल्याचा फिर्यादीने केला. या प्रकरणी कोर्टात हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी शस्त्र कायदा कलम जोडल्याचे ते म्हणाले.
अमर मांद्रेकर म्हणाले, या पंचसदस्यांसोबत आलेल्या त्यांच्या कामगारांची पोलिसांनी चौकशी करावी. कारण, हे सर्वजण राज्याबाहेरील होते. आम्हाला संशयिताकडून धमकी मिळत आहे. अशावेळी मला असुरक्षित वाटत आहे.
त्याचप्रमाणे, पंचसदस्याजवळील कथित बंदूक व घटनेदिवशी वापरलेली वाहन पोलिसांनी जप्त करावे. याप्रकरणी गृहमंत्री तसेच पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.