Goa: वेळसाव समुद्र किनाऱ्यावर बंपर कोळंबी

मासेमारी करणे सुरूच असून आज अशाच एका पडावात बंपर कोळंबी (Kolambi Fish) जाळ्यात गवसली.
Kolambi Fish
Kolambi FishDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात (Goa) अधिकृतरित्या मासळीमारी 1 आगस्ट पासून सुरू होणार असली तरी लहान पडाव घेऊन मासेमारी करणे सुरूच असून आज अशाच एका पडावात बंपर कोळंबी (Kolambi Fish) जाळ्यात गवसली. आज सायंकाळी हा पडाव किनाऱ्याला लागल्यावर लोकांनी तिथे गर्दी केली होती. बऱ्याच दिवसांनी मनाप्रमाणे मासळी जाळ्यात सापडल्याची खुशी मच्छिमाराच्या तोंडावर दिसत होती.

मागचे काही दिवस समुद्रात वादळी वारे असल्याने कुणी होड्या समुद्रात घातल्या नव्हत्या मात्र कालपासून समुद्र शांत झाल्याने आज होड्या पाण्यात सोडण्यात आल्या होत्या. सध्या गोव्यात यांत्रिकी होड्यानी मासेमारी करण्यास बंदी असून 1 ऑगस्ट रोजी ही बंदी उठणार आहे. मच्छीमारी बंदी उठवण्यासाठी अजून दोन-चार दिवस बाकी असतानाच आज खारीवाडा मच्छीमारी मालकासाठी सुवर्ण दिवस ठरला आहे .

Kolambi Fish
Goa: मच्छिमाऱ्यांसाठी आजचा सुवर्ण दिवस,खारीवाडा येथे सोलार झिंगाची बंपर आवक.

दरम्यान, आज संध्याकाळी भंपर सोलर झिंगा लागल्याने मच्छीमारी व्यावसायिक सुखावलेले पाहायला मिळाले . सोलार झिंगा जाळ्यात सापडल्याची वार्ता सर्वत्र पसरताच खारी वाडा येथे एकच गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसराला आज जत्रेचे स्वरूप आले होते. घाऊक विक्रेते तसेच इतर खरेदीदार झिंगा खरेदीसाठी तुटून पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com