Goa Road Accident: जंगली जनावराला वाचवण्याच्या नादात रेडीघाट येथे कारचा अपघात

Goa Road Accident: वाळपई येथे एका जंगली प्राण्याला वाचवण्याच्या नादात एका कारचा अपघात झालाय.
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Road Accident: गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडत असल्याचे वारंवार समोर येतेय. मात्र वाळपई येथे एका जंगली प्राण्याला वाचवण्याच्या नादात एका कारचा अपघात झालाय.

वाळपई ते होंडा यादरम्यान रेडी घाट येथे रस्त्यावर अचानक आलेल्या कटांदरनामक (काळ्या रंगाचा, मांजरीच्या आकाराचा) जंगली प्राण्याला वाचवण्याच्या नादात कारचालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाल्याच्या प्रकार झालाय.

सुदैवाने या घटनेत कार चालकाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती हाती आली आहे.

Goa Road Accident
Mapusa Municipal Council: म्हापशातील पे-पार्किंगसाठी निविदा काढणार; पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा

गोव्यातील ग्रामीण भागात जाणारे रस्ते हे काहीश्या जंगली भागातून जातात. दिवसभरात कधीतरी या रस्त्यांवर जंगली प्राणी दृष्टीस पडतात.

त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करताना जपून आणि कमी वेगात प्रवास करावा लागतो. तसेच गोव्यात भटक्या जनावरांचाही त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो.

त्यामुळे चालकांना स्वतःचा आणि त्या प्राण्यांचा जीव सांभाळत सावधगिरीने वाहन चालवावे लागते. रेडीघाट मधील त्या प्रकरणात जंगली प्राण्याला वाचवण्यासाठी कार चालकाने गाडी आवरण्याचा प्रयत्न केला त्यातच कार पलटली झाल्याची माहिती समोर आलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com