Mapusa Municipal Council: म्हापशातील पे-पार्किंगसाठी निविदा काढणार; पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा

म्हापसा नगरपालिकेने शहरातील पे-पार्किंगच्या दुसर्‍या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला.
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा नगरपालिकेने शहरातील पे-पार्किंगच्या दुसर्‍या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये आराम सोडा लेनमध्ये पे-पार्किंगचा समावेश असेल. आणि युनियन फार्मसी ते हळदोणा टॅक्सी स्टॅण्डपर्यंत दुचाकी व चारचाकीं पे-पार्किंग राहिल. नुकताच, पालिका मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली.

Mapusa Municipal Council
Goa Daily News Wrap: गुन्हे, क्रीडा, राजकीय व इफ्फी संबधित घडमोडींचा आढावा, वाचा एका क्लिकवर...

म्हापसा पालिकेने युनियन फार्मसी ते लोजा चिमुलकरपर्यंतचा रस्ता, कॅनरा बँक हा दुचाकी वाहनांसाठी, काळ्या व पिवळ्या टॅक्सी वगळता आराम सोडा लेनच्या आतील व बाहेरील दोन्ही लेन, उसपकर चने दुकानासमोरचा रस्ता पे-पार्किंगसाठी असेल.

दुचाकींना दोन तासांपर्यंत पे-पार्किंग शुल्क १०रुपये असेल आणि त्यानंतरच्या तासांसाठी ५रुपये असेल. तर चारचाकींना दोन तासांपर्यंत २०रुपये व त्यानंतरच्या तासांसाठी १०रुपये असेल. जवळपास ३६१ दुचाकी पार्क करता येतील. आणि नियुक्त भागात पे-पार्किंगच्या चारचाकींसाठी सुमारे ३५ स्लॉट उपलब्ध असतील.

नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी माहिती दिली की, जिल्हाधिकार्‍यांनी म्हापसा येथील पे-पार्किंग सुविधेबाबत अधिसूचना जारी केली आहे. आणि त्यामुळे आम्ही निविदा काढण्याबाबत पुढे जाण्यासाठी पालिका बैठकीपुढे प्रस्ताव मांडलेला.

नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर म्हणाले की, शहरातील संमिश्र पे-पार्किंग योजना ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याने आम्हाला रात्री १२वाजेपर्यंत पे-पार्किंग सेवा लागू करणे आवश्यक आहे. प्रस्तावित रक्कमेचे अवमूल्यन होत असल्याने स्लॉटची योग्य गणना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी सहमती दर्शवत आम्ही मोजणी करु आणि त्यानुसार, निविदा रक्कम ठरविला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, चर्चेनंतर निर्धारित अधिसूचित क्षेत्रात सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पे-पार्किंगची सुविधा ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, पालिकेने यापूर्वीच मार्केट भागात पे-पार्किंग सुविधेसाठी निविदा काढली होती. परंतु एकच बोली मिळाल्याने आवश्यक मंजुरीसाठी हे प्रकरण पालिका संचालकांकडे पाठविण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com