अभाविपने घेतली कुलगुरू- कुलसचिवांची भेट; विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडवण्याची मागणी

विद्यापीठ आवारात इलेक्ट्रिक बाइकचे चार्जिंग पॉइंट लावावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
ABVP
ABVPDainik Gomantak
Published on
Updated on

ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा शिष्टमंडळाने आज गोवा विद्यापीठाच्या कुलगुरू आणि कुलसचिवांची संयुक्त भेट घेतली. यावेळी गोव्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.

निवेदनात विद्यापीठ परिसरातील विषय, विद्यापीठाला संलग्न महाविद्यालय परिसरातील विषय आणि प्रोफेशनल कॉलेजेस समस्या अशा तीन भागात निवडून त्यावर चर्चा करण्यात आली.

विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन व कुलसचिव वि. स. नाडकर्णी यांनी प्रत्येक मुद्द्यावर खोल चर्चा केली व त्यावर विद्यार्थी परिषदेने सुचविलेले विचार जाणून घेतले.

ABVP
Rawanfond Accident: रावणफोंड येथे ट्रकच्या धडकेत पादचारी ठार; ट्रकचालक फरार

यावेळी विद्यापीठात ये जा करण्यासाठी कदंबा महामंडळासोबत मिळून बस व्यवस्था करावी, पाण्याची समस्या, स्वच्छतागृह, विद्यापीठ परिसरात सुरक्षेबाबत ध्यान देत सीसीटीव्ही कॅमेरा तसेच अन्य सुरक्षा मजबूत करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या होणाऱ्या समस्यांची पण चर्चा झाली. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक बाइक साठी प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ आवारात इलेक्ट्रिक बाइक चे चार्जिंग पॉइंट लावावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

ABVP
राज्याला बुद्धिबळात नाव कमवायचे असेल तर 'या' गोष्टीची आहे गरज, संघटनेने केलीय क्रीडामंत्र्यांकडे 'ही' मागणी

अनेक वर्षापासून अडकलेल्या स्कॉलरशिप यापुढे विद्यार्थ्यांना वेळेवर मिळावेत, विद्यापीठाची वेबसाईट संपूर्णपणे अपडेट करून ती विद्यार्थ्यांना सहज माहिती मिळता यावे अशी असावी, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडला मिळावेत, विद्यार्थी मंडळ स्थापनेच्या वेळी विद्यापीठाकडून प्रत्येक कॉलेजला समान पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कायदा करावा,

तसेच पेपर चॅलेंजिंग साठी घेण्यात येणारी मोठी फी रक्कम कमी करावी व त्या ऐवजी फक्त री ईव्हेलूएशन ठेवावी, जीएमसी मध्ये पीएचडी शिक्षण असलेले प्राध्यापक नेमावे, आयुर्वेदा आणि होमिओपॅथी कॉलेजच्या स्टाईपेंड वाढवावी अश्या अनेक विद्यार्थी हिताच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कुलगुरू व कुलसचिवांनी या मागण्यावर त्वरित काम करण्यात येणार असे सांगितले. तसेच विद्यार्थी परिषदेच्या निवेदनाला लेखी उत्तर लवकरच मिळणार असेही सांगितले.

निवेदन सादर करताना गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक, दक्षिण गोवा संयोजक अक्षय शेठ, विद्यापीठ अध्यक्ष शिशिर परब, तसेच अन्य विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता उपस्थित होते. दोन तासाच्या सखोल चर्चेनंतर अभाविपच्या सगळ्या मागणी स्वीकारले जाणार अशे आश्वासन विद्यापीठाकडून मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com