Goa Doordarshan: गोवा दूरदर्शनचा 10 लाखांचा कॅमेरा अंधेरीच्या गर्दीत हरवला, कसलाच सुगावा नसताना मुंबई पोलिसांनी असा घेतला शोध

मुंबई पोलिसांचा जगात डंका आहे. तेथील पोलिसांची यंत्रणा आणि त्यांची तपासाच्या क्षमतेची वेळोवेळी प्रचिती आली आहे.
Goa - Mumbai Police
Goa - Mumbai PoliceDainik Gomantak

मुंबई पोलिसांचा जगात डंका आहे. तेथील पोलिसांची यंत्रणा आणि त्यांची तपासाच्या क्षमतेची वेळोवेळी प्रचिती आली आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला तो म्हणजे गोवा दूरदर्शनचा 10 लाख किंमतीचा कॅमेरा अंधेरीच्या गर्दीत हरवला आणि कसलाच सुगावा नसताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याचा शोध घेतला आणि कॅमेरा गोवा दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांना परत केला.

(Goa Doordarshan Camera Lost In Andheri)

झाले असे की, गोवा दूरदर्शनचे टेक्निशियन धनराज गिरी हे पणजी येथून कॅमेरा दुरुस्तीसाठी अंधेरी एमआयडीसी परिसरात घेऊन गेले होते.

कॅमेरा दुरुस्तीचे काम उरकल्यानंतर गिरी आणि त्यांचे सोबती सहकारी रिपोर्टिंग करण्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या वरळी कार्यालयाकडे निघाले. दरम्यान, त्यांनी चकाला मेट्रो स्थानकाकडे रिक्षा पकडली.

चकाला येथे पोहोचल्यानंतर ते कॅमेरा न घेता तसेच निघून गेले. पण, कॅमेरा विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत कॅमेरा हरवल्याची तक्रार दिली.

Goa - Mumbai Police
पानिपत येथे गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला गोव्यात अटक, अडीच वर्षांपासून होता फरार

तक्रार प्राप्त होता पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यरत करत शोधाशोध सुरू केली. कसलाच सुगावा नसताना पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते.

मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शाखेने तक्रारदार यांच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला.

तपासादरम्यान, रिक्षा पवई फिल्टर पाडा परिसरातील असल्याचे पोलीसांना समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत रिक्षा चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे तो कॅमेरा आढळून आला. त्यानंतर कॅमेरा कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आला.

काहीच माहिती नसताना थोड्याच कालावधीत मुंबई पोलिसांनी लावलेल्या शोधाचे आणि केलेल्या मदतीचे निवारण वेळेत केल्याने पोलिसांनी केलेल्या मदतीचं गोवा दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com