Goa university teachers association Press
Goa university teachers association PressDainik Gomantak

Goa University: अखेर ‘त्या’ विद्यार्थ्याचे नमते; प्राध्यापक एकवटले

गोवा विद्यापीठातील गुंडागर्दीचा केला निषेध
Published on

Goa University Teachers Threatened By Student: गेल्‍या काही दिवसांपासून गोवा विद्यापीठात काही विद्यार्थ्यांकडून गुंडागर्दी सुरू आहे. आता तर त्‍यांनी विद्यार्थी कल्याण आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावले.

या प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. दरम्यान त्या विद्यार्थ्याने पोलिस कारवाईच्या भीतीने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागून प्राध्यापकांपुढे नमते घेतले.

तत्पूर्वी गुंडागर्दी करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर त्‍वरित कारवाई केली नाही, तर विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेवर शिक्षक संघटना बहिष्कार टाकेल, असा इशारा गोवा विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी दिला.

प्राध्यापकांनी आज विद्यापीठात नाराजी व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या या कृतीचा निषेध केला. विद्यापीठ आवारात आज विद्यार्थी कल्याण संचालक अँथनी व्हिएगस व सर्व प्राध्यापक एकत्र आले व विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या गुंडगिरीचा निषेध करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्‍या.

विद्यापीठातील गुंडप्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, अन्यथा विद्यापीठात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Goa university teachers association Press
Cumbarjua Canal: कुंभारजुवे खाडी धोक्यात; पर्यावरणप्रेमींकडून चिंता

सध्‍या गोवा विद्यापीठात जी गुंडगिरी सुरू आहे, ती विद्यापीठाला शोभणारी नाही. शिशिर परब व त्‍याचे काही सहकारी वारंवार संचालकांना धमकावत आहेत. त्‍यामुळे ते मागील कित्येक दिवसांपासून तणावात आहेत.

विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात नाही. कारवाई करण्यापासून विद्यापीठाला कोण रोखत आहे? कोणाकडून दबाव आणला जात आहे? असा सवाल प्रा. रामराव वाघ यांनी यावेळी उपस्‍थित केला.

अभाविपवर बंदी घाला : एनएसयूआय

शिशिर परब हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थी आहे. त्याच्याबाबत आता प्राध्यापकांनी तक्रार करून देखील कारवाई केली जात नाही.

यावरून विद्यापीठ प्रशासनावर दबाव असल्याचे स्पष्ट होते. अभाविपद्वारे वारंवार गैरकृत्ये करण्याचा प्रकार घडत असल्याने विद्यापीठ परिसरात या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी एनएसयूआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली.

Goa university teachers association Press
Old Goa: खड्ड्यातील पाण्यात बुडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; जुने गोवेतील घटना

प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्या

  1. घडलेल्या प्रकारांची कसून चौकशी व्हावी

  2. विद्यार्थी, प्राध्यापकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे

  3. निवडणुकांपर्यंत त्या विद्यार्थ्याला बडतर्फ करावे

अखेर विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांपुढे नमते

गोवा विद्यापीठात घडलेल्या प्रकाराबाबत आगशी पोलिसांनी कारवाइ केली असून शिशिर परब याला पोलिस स्थानकात बोलावून त्याची चाैकशी केल्यानंतर त्याने प्राध्यापक रामराव वाघ व ॲन्थोनी व्हिएगस यांच्या उपस्थित नमते घेतले.

त्याने झालेल्या प्रकराबद्दल माफी मागितली. असा प्रकार पुन्हा घडू नये, असे पोलिसांनी त्याला खडसावले.

त्यांना राजकीय आशीर्वाद?

शिशिर परब आणि त्‍याच्‍या साथीदारांची दादागिरी वाढत चालली आहे. आता तर त्‍यांनी विद्यार्थी कल्याण आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावले आहे.

याबाबत अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. हा प्रकार घडताना पोलिसही उपस्थित होते. त्यामुळे अशा घटना आशीर्वादाशिवाय शक्‍य नाहीत, असा आरोप प्रा. रामराव वाघ यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com