Old Goa: खड्ड्यातील पाण्यात बुडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; जुने गोवेतील घटना

मालकाविरुद्ध गुन्हा नोंद
drown
drownDainik Gomantak

Old Goa News: जुने गोवे येथील शिव मंदिराजवळ बंद असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खुल्या सिमेंटच्या खड्ड्यात पडून जिमी राजू हेमब्रोम या ५ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी बांधकाममालक राजेश पाटील याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

drown
37th National Sports Competition: संदीप हेबळे गोव्याचे ‘चेफ द मिशन’; गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमब्रोम कुटुंबीय या बंद असलेल्या बांधकामाच्या बाजूला असलेल्या झोपडीत राहतात. आईवडील मजुराचे काम करतात. काल सकाळी ते मुलाला घरी ठेवून नेहमीप्रमाणे कामासाठी निघून गेले.

झोपड्या असलेल्या ठिकाणी राजेश पाटील याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी तेथे सिमेंटचा खड्डा खोदण्यात आला होता.

हल्ली गेले काही दिवस पाऊस पडत असल्याने या खड्ड्यामध्ये पाणी साचले होते. हा खड्डा सुमारे पाच ते सहा फूट खोल होता व तो खड्डा पाण्याने तुडुंब भरलेला होता.

या ठिकाणी असलेल्या इतर झोपड्यांतील कामगारही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे तेथे जवळपास कोणीही नव्हते.

जिमी राजू हेमब्रोम हा झोपडीत एकटाच होता. काल दुपारी तो झोपडीबाहेर पडला व पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ तो गेला. त्यावेळी तोल जाऊन तो खड्ड्यात पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

संध्याकाळी या मुलाचे आईवडील घरी परतले असता जिमी झोपडीत नव्हता. त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली, त्यावेळी त्याचा मृतदेह पाण्याने भरलेल्या सिमेंटच्या खड्ड्यात तरंगताना आढळून आला.

खड्डा खुला ठेवल्याने घडला अनर्थ

बांधकाम बंद असलेल्या ठिकाणचा खड्डा खुला ठेवण्यात आला होता. तो झाकून ठेवला असता, तर हा अनर्थ घडला नसता.

बांधकाम बंद असतानाही हा खड्डा खुला ठेवण्यात आल्यामुळे तो मुले तसेच इतरांना धोकादायक होता. त्यासाठी संशयित बांधकाममालक राजेश पाटील याने आवश्‍यक ती सुरक्षितता बाळगण्याची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही घटना घडली.

drown
Cumbarjua Canal: कुंभारजुवे खाडी धोक्यात; पर्यावरणप्रेमींकडून चिंता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com