Private University: गोव्यात खासगी विद्यापीठांना मान्यता देऊ नका, गोवा स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनची सरकारकडे मागणी

Goa Schools Oppose Private University Approvals: राज्य सरकार गोव्यात खासगी विद्यापीठांना मान्यता देत आहे, ही गंभीर बाब असून त्याचा परिणाम गोव्यातील स्थानिक महाविद्यालयांवर होणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठांना सरकारने मान्यता देऊ नये, अशी मागणी गोवा स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने केली आहे.
Goa School Management Association
Goa School Management AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: राज्य सरकार गोव्यात खासगी विद्यापीठांना मान्यता देत आहे, ही गंभीर बाब असून त्याचा परिणाम गोव्यातील स्थानिक महाविद्यालयांवर होणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठांना सरकारने मान्यता देऊ नये, अशी मागणी गोवा स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने केली आहे.

दक्षिण गोव्यात (South Goa) पारूल तर उत्तर गोव्यात एमआयटी व इतर दोन विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. एका एका विद्यापीठात प्रत्येकी ५ ते १० हजार विद्यार्थ्यांची नाव नोंदणी होत असते. अशा परिस्थितीत गोमंतकीय महाविद्यालय व गोवा विद्यापीठाचे भवितव्य काय? शिवाय या खासगी विद्यापीठांमध्ये भरपूर फी आकारली जाते, असे यावेळी सांगण्यात आले.

Goa School Management Association
Goa Private School Fees: गतवर्षी राज्यातील विनाअनुदानित 6 शाळांकडून शुल्कवाढ नाही! 1 लाखाहून अधिक शुल्क आकारणाऱ्या 3 शाळा

मंगळवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या वतीने पांडुरंग नाडकर्णी, प्रशांत नाईक व प्रदीप काकोडकर यांनी याबाबतची भूमिका मांडली. जर खासगी विद्यापीठांना मान्यता दिली तर पुढील दोन ते तीन वर्षांत गोव्यातील शैक्षणिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात ज्या समस्या आहेत त्या मुख्यमंत्री, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव यांच्याकडे मांडण्यात येईल, असे पांडुरंग नाडकर्णी यांनी सांगितले. आठ महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी विनंती केली होती. पण आम्हाला अजून त्याचे उत्तर मिळाले नसल्याचे प्रशांत नाईक यांनी सांगितले.

कायमस्वरूपी शिक्षक नियुक्तीत भेदभाव

शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळेत पूर्ण वेळ कायमस्वरूपी शिक्षक नियुक्तीसाठी सरकारकडून परवानगी मिळत नाही. या शैक्षणिक संस्था सरकारचे सर्व मार्गदर्शक नियम पाळत आहेत. प्रथमच अशी परवानगी नाकारण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. केवळ कंत्राटी व तात्पुरत्या काळासाठी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करण्यासाठी परवानगी दिली जाते असे यावेळी सांगण्यात आले. काही शाळांना कायम स्वरुपी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी घेण्यासाठी मान्यता दिली जाते. हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Goa School Management Association
Private Jobs In Goa: 'खासगी कंपन्यांनी राज्यातच नोकऱ्यांची जाहिरात देणे बंधनकारक, अन्यथा..'; काय म्हणाले मुख्यमंत्री, पाहा

बालरथ बंद करू नयेत

बालरथ योजना सरकारने सुरु केली होती. यापूर्वी जे बालरथ दिले होते त्यांना १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नियमानुसार हे बालरथ भंगारात काढण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थिती सरकारने शाळांना नवीन बालरथ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांना (Students) बालरथाची सवय जडली आहे. अशा परिस्थितीत बालरथ योजना बंद करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Goa School Management Association
Goa Private Bus Owners: प्रतिलिटर 3 रुपयांचं अनुदान बंद केल्याने बसव्यवसाय परवडेना, जाणून घ्या समस्या

...तर क्रांती दिनी मोठा निर्णय

गोवा स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने उपस्थित केलेले मुद्दे व मागण्यांबाबत सरकारने योग्य पावले न उचलल्यास गोवा क्रांती दिनी मोठा निर्णय घेतला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com