Goa University: विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे संपूर्ण सत्य बाहेर आणा! प्रश्‍नपत्रिका चोरीप्रकरणी NSUI आक्रमक; राज्यपालांना निवेदन सुपूर्द

Goa University Professor Paper Leak Scam: विद्यापीठात एका प्राध्यापकाला प्रश्नपत्रिका चोरी रंगेहाथ पकडण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
NSUI protests Goa University
NSUI protests Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणावर राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) आक्रमक झाली असून विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला पाठीशी घालून प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याबाबत तातडीने कठोर कारवाईची करावी, अशी मागणी एनएसयुआय, गोवा प्रदेश काँग्रेस समिती आणि इंडियन यूथ काँग्रेसकडून राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यापीठात एका प्राध्यापकाला प्रश्नपत्रिका चोरी रंगेहाथ पकडण्यात आले होते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपासून या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्याने विद्यापीठातील भ्रष्टाचार, घराणेशाही आणि जबाबदारीच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे विद्यापीठाची विश्वासार्हता आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असे एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले.

NSUI protests Goa University
Goa University: पेपर फॉर लव्ह प्रकरण! कुलपतींच्या हाती प्राथमिक अहवाल; आता समितीच्या अहवालाकडे लक्ष

एनएसयूआयने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणात गुंतलेल्या प्राध्यापकाला तात्काळ सेवामुक्त करा, तसेच या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी एका स्वतंत्र तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

NSUI protests Goa University
Goa University: पेपर चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न! कुलगुरू, कुलसचिवांची परस्परविरोधी वक्तव्ये; अहवालाचा नाही थांगपत्ता

आंदोलनाचा इशारा

तत्काळ कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थी हिताचे रक्षण आणि गोवा विद्यापीठाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी, गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर, गोवा प्रदेश युवा संघटनेचे कार्याध्यक्ष महेश नादर, गोवा प्रदेश युवा संघटनेचे सरचिटणीस प्रसंजित धागे, एनएसयूआयचे सदस्य अब्दुल गनी सैय्यद, तसेच सदस्य ऋषभ फळदेसाई आणि कुमार गौळी यांच्या सह्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com