Goa University: 'मोबाईल पाण्यात पडलाय'! पेपरचोरी प्रकरणातील संशयित प्राध्यापकाचे पोलिसांना उत्तर; दुसऱ्यांदा होणार चौकशी

Goa University Paper Leak Scam: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरीप्रकरणी आगशी पोलिसांकडून साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याची दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे.
Goa University News
Goa University Paper Leak ScamDainik GOmantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरीप्रकरणी आगशी पोलिसांकडून साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याची उद्या, २४ मार्च रोजी दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे.

चौकशीस तो सहकार्य करत नसल्याने त्याला ताब्यात घेण्यासंदर्भातही पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्यांनाही समन्स पाठवून चौकशीला बोलावले जाणार असल्याची माहिती आगशी पोलिस सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्याने विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गोवा विद्यापीठाने अंतर्गत केलेल्या चौकशीच्या अहवालानुसार आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या अहवालात गोवा विद्यापीठाने कोणतेही ठोस निष्कर्ष काढलेला नाही. संशयित प्रणव नाईक याने प्रश्‍नपत्रिका चोरी केल्यासंदर्भात कोणताच उल्लेख नाही. मात्र, प्रश्‍नपत्रिका ज्या खोलीमध्ये ठेवल्या होत्या, तेथे तो एक-दोनवेळा गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्याचे नमूद केले आहे.

Goa University News
Goa University: विद्यापीठातले 'पेपरचोरी' प्रकरण हिमनगाचे टोक! राष्ट्रीय स्तरावर आपण पिछाडीवर का? याचा विचार करायला हवा..

संशयित प्रणवचे गेल्या वर्षभरातील मोबाईलमधील कॉल डिटेल्स तसेच ज्या विद्यार्थिनीला ती प्रश्‍नपत्रिका दिली, तिच्याशी व्हॅट्स ॲप मेसेजिसही संबंधित मोबाईल कंपनीकडे मागण्यात आले आहेत. ही प्रश्‍नपत्रिका किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली, याची माहिती मिळवण्यासाठी ‘त्या’ विद्यार्थिनीलाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोवा विद्यापीठ निबंधकांनाही प्रश्‍नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबिली जाते, याची माहिती मिळवण्यासाठी जबानी नोंद होण्याची शक्यता आहे. सरकारने स्थापन केलेली समिती तसेच पोलिस चौकशी अशा दुहेरी चौकशीला संशयित साहाय्यक प्राध्यापकाला सामोरे जावे लागणार आहे.

Goa University News
Goa University: कडक शब्दांत जाब विचारण्याचे धाडस गोवा सरकारला का होत नाही? गोवा विद्यापीठातील ‘केरळा स्टोरी'

म्हणे, मोबाईल पाण्यात पडला

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी गोवा विद्यापीठाकडे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागितले आहेत. तसेच संशयित प्रणव नाईक याचा मोबाईल संच पोलिसांनी मागितला आहे. मात्र, तो पाण्यात पडल्याचे कारण प्रणवने पोलिसांना शनिवारी केलेल्या चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com