Goa University LLB Admission Scam: एलएलबी प्रवेश परीक्षा घोटाळ्याची विद्यापीठ स्तरावर चौकशी सुरू

आज संबंधितांना चौकशीसाठी पाचारण; विद्यार्थ्यांनाही मिळणार म्हणणे मांडण्याची संधी
Goa University LLB entrance exam scam
Goa University LLB entrance exam scamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University LLB Entrance Exam Scam: मडगावच्या कारे कायदा महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विद्यापीठ समितीने उद्या (गुरुवारी) सर्व संबंधितांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. या समितीसमोर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

विद्यापीठातील सूत्रांनी या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, डीन सविता केरकर यांच्या समितीच्या सदस्यांनी अधिकृत पत्र मिळाल्यानंतर आपल्या कामाचा ताबा घेतला.

या समितीमध्ये वृंदा बोरकर, रोनाल्ड रॉड्रिग्स, विकास पिसुर्लेकर, कारे कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी आदी सदस्य असून उद्या त्यांनी कारे कॉलेजच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे घेऊन समितीसमोर पाचारण केले आहे.

Goa University LLB entrance exam scam
Mapusa Water Shortage: म्हापशात भरपावसात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे रास्ता रोको; अचानक आंदोलन केल्याने तणाव

‘कॉलेजचा वादग्रस्त प्राचार्य वगळता इतर अधिकाऱ्यांना उद्याच चौकशीसाठी बोलावले आहे’, अशी माहिती सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली. सूत्रांच्या मते, कॉलेज व्यवस्थापनाने सांगितल्याने हे प्राचार्य कालपासून रजेवर गेले आहेत.

त्यांची मेहेरनजर झालेला त्यांचा पुत्र प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्याच्याचसाठी परीक्षा गुण पद्धतीत ऐनवेळी बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Goa University LLB entrance exam scam
Goa Monsoon Update 2023: रेड अलर्ट जारी; 9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार, आज शैक्षणिक संस्थांना सुटी

रजेवर नको, निलंबित करा!

एलएलबी प्रवेश प्रक्रियेत घातलेल्‍या घाेळाची चौकशी सुरू झाल्‍यावर कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. साबा दा सिल्‍वा हे रजेवर गेले असले तरी त्‍यांना रजेवर न पाठविता निलंबित करा, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना ‘एनएसयुआय’नेही हीच मागणी केली असून सरकारने या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालण्‍याची गरज व्‍यक्‍त केली आहे.

शिक्षण संचालकांनी हस्‍तक्षेप करावा

‘एनएसयुआय’चे अध्‍यक्ष नौशाद चौधरी म्हणाले की, डॉ. दा सिल्‍वा यांनी या कायद्याची पायमल्‍ली केली. त्‍यामुळे त्‍यांना त्‍वरित निलंबित करावे. या प्रकरणात उच्‍च शिक्षण संचालकांनी हस्‍तक्षेप करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com