Goa University: खांडोळा महाविद्यालयास विजेतेपद

Goa University: अंतिम लढतीत डीएम्स महाविद्यालयाला नमविले
Goa University
Goa UniversityDainik Gomantak

Goa University: अटीतटीच्या अंतिम लढतीत आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळ (डीएम्स) महाविद्यालयावर दोन विकेटने विजय नोंदवून खांडोळा सरकारी महाविद्यालयाने गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सामना सोमवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला.

डीएम्स महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी केली. आर्यन नार्वेकर (६७) व उदित यादव (४५) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर त्यांनी २० षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या.

खांडोळा महाविद्यालयाच्या नरेंद्र तारी (३-३०), पार्थ कोसंबे (२-२१), अब्दुल मशाल (२-२७) यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले.

नंतर सर्वेश सावंत याच्या आक्रमक ८९ (६० चेंडूंत) धावांच्या बळावर खांडोळा महाविद्यालयाने २० षटकांत ८ बाद १५० धावा करून सामना जिंकला. डीएम्सतर्फे आर्यन नार्वेकर (२-१९) व फरदिन खान (२-२६) गोलंदाजीत सफल ठरले.

Goa University
Goa Crime Case: भाटपाल-काणकोणात जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू , वर्मी मार लागल्‍याने मृत्यू झाल्याचा संशय

गोवा विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता संगम तळावलीकर, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा सहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

वैयक्तिक बक्षिसे

अंतिम सामन्याचा मानकरी: सर्वेश सावंत (खांडोळा), उत्कृष्ट फलंदाज ः यश गडेकर (डीएम्स), उत्कृष्ट गोलंदाज ः अब्दुल मशाल (खांडोळा), स्पर्धेचा मानकरी ः आर्यन नार्वेकर (डीएम्स)

विजेता खांडोळा महाविद्यालय संघ

ऋषिकेश नाईक, ऋषभ फडते गावकर, नरेंद्र तारी, सर्वेश सावंत, साईश च्यारी, पंकज पालकर, तनीष खेडेकर, पार्थ कोसंबे, नितीन गावडे, सौरव शर्मा, अथर्व परांजपे, ओमकार नावेलकर, निश्चय नाईक, साईश गावडे, अब्दुल मशाल व शार्दुल शेट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com