Bank Fraud Case: बँक व्यवहारातून ज्‍येष्‍ठ नागरिकाची तब्‍बल 4.5 लाखांची फसवणूक

मडगावातील प्रकार : बाणावलीतील वृद्ध खातेदाराची पोलिसांत तक्रार
Bank Fraud Case
Bank Fraud CaseDainik Gomantak

Bank Fraud Case: बाणावली येथील ज्येष्ठ नागरिक सेफ पिंटो यांची मडगाव येथील राष्ट्रीयकृत बॅंकेच्या व्यवहारातून साडे चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले.

फसवणूक झाल्याचे स्वत: पिंटो यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

सदर व्यवहार यूपीआय कोड (युनिफाईड पेमेंटस इंटरफेस)द्वारे झाल्याचे सांगण्यात आले. पिंटो यांनी सांगितल्याप्रमाणे, २८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी त्यांच्या मडगावच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्‍या बचत खाते (२००२०८०७७५९)मधून प्रथम ९०,११८ व लगेच ९,५३२ रुपये काढण्यात आल्याचे उघडकीस आले.

Bank Fraud Case
9 Years of PM Modi :मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाचा चेहरा बदलला : कराड

तत्‍काळ बॅकेत येऊन एटीएम कार्ड ब्लॉक करण्यास बॅंक प्रबंधकांना सांगितले. बॅंक प्रबंधकांनी एटीएम कार्ड ब्लॉक करण्याऐवजी एटीएम कार्ड हरवले असा अर्ज आपल्याकडून भरून घेतला व एटीएम कार्ड बदलून देतो, असे सांगून जुने एटीएम कार्ड घेतल्याचे पिंटो यांनी सांगितले.

त्‍यानंतर २९ एप्रिल रोजी आपल्या खात्यातून दहावेळा प्रत्येकी पाच पाच हजार मिळून ५० हजार रुपये तसेच ३० एप्रिल रोजी दोनवेळा ५० हजार व १ मे रोजी दोन वेळा ५० हजार रुपये व २ मे रोजी दोन वेळा ५० हजार रुपये काढल्याचे आपल्याला काही रक्कम खात्यामध्ये भरण्यास गेलो तेव्हा लक्षात आले, असेही पिंटो म्‍हणाले.

या संदर्भात आपण बॅंक प्रबंधकाला जाब विचारला असता तो काहीच सांगू शकला नाही, असेही पिंटो यांनी नमूद केले आहे.

Bank Fraud Case
Goa Statehood Day 2023 : राजीव गांधींमुळेच घटक राज्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण

बँकेकडून रक्‍कम मिळावी!

प्रथम ९०,११८ व नंतर ९,५३२ रुपये काढण्याचा जो व्यवहार झाला, त्यात आपली चूक होती हे मान्य! पण, एकदा एटीएम कार्ड बॅंकेत दिल्यावर जी साडेतीन लाख रुपये रक्कम काढण्यात आली, त्याबद्दल आपल्याला संशय आहे. ही रक्कम आपल्याला बॅंकेकडून मिळाली पाहिजे, अशी पिंटो यांची मागणी आहे.

या संदर्भात मडगाव पोलिस स्थानकात तक्रार देण्‍यात आली असून, त्याची प्रत मुख्यमंत्री, डीआयजी, सायबर पोलिस, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्‍या पुणे येथील मुख्य कचेरीला पाठविल्याचे पिंटो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com