Illegal Indian Immigrants
Illegal Indian ImmigrantsDainik Gomantak

Illegal Indian Immigrants: अमेरिकेत अडकलेले ते दोन गोमंतकीय गोव्यात दाखल

Illegal Immigrants: अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या दोन गोमंतकीय नागरिकांना गोव्यात परत आणण्यात आलं आहे.
Published on

पणजी : अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या दोन गोमंतकीय नागरिकांना गोव्यात परत आणण्यात आलं आहे. अधिकृत प्रोटोकॉलअंतर्गत त्यांना परत आणण्यात आलं आहे. अमेरिकेतील स्थलांतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या गोमंतकीय नागरिकांना स्वदेशी परत पाठवण्यात आलं आहे.

अमेरिकेतून हद्दपार झालेल्या गोव्यातील या दोन नागरिकांच्या परतीची प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रशासनाकडून सोय करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षित प्रवासाची पूर्ण जबाबदारी घेत, आवश्यक सर्व व्यवस्था प्रशासनाने घेतली होती. ईतर राज्यातील नागरिकांनाही त्यांच्या मूळ राज्यांमध्ये सुरक्षित पोहोचवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ११९ भारतीय नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. यापैकी ६७ पंजाबचे, ३३ हरियाणा, ८ गुजरात, ३ उत्तर प्रदेश, २ राजस्थान, २ महाराष्ट्र, २ गोवा आणि प्रत्येकी एक हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचे आहेत.

Illegal Indian Immigrants
Goa Weather: गोव्यात कमाल तापमानात घट; थंडीचा प्रभाव मंदावला! पुढील 48 तासांत कसे राहणार हवामान? वाचा

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठविण्याची ही प्रक्रिया यापूर्वीही झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकन लष्कराच्या सी-१७ विमानाद्वारे १०४ भारतीय स्थलांतरितांना अमृतसर येथे आणले होते. त्यापैकी ३० पंजाबचे, ३३ हरियाणा, ३३ गुजरात, ३ महाराष्ट्र, ३ उत्तर प्रदेश आणि २ चंदीगडचे होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर कारवाई करत, त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याची प्रक्रिया वेगाने राबविली आहे. या धोरणांतर्गत अमेरिकेने भारतासह इतर देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमानांचा वापर केला आहे.

Illegal Indian Immigrants
Goa Ambulance: गोव्यात 108 ची कमतरता; 'तातडीने वैद्यकीय मदत कशी मिळवावी?' स्थानिक चिंतातुर!

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या परताव्याबाबत भारत आणि अमेरिकेच्या सरकारांमध्ये चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानवी तस्करीविरुद्ध लढा देण्याची गरज व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com