खून प्रकरणात जन्मठेप भोगणारे तिघे ठरले निर्दोष, सत्र न्‍यायालयाचा निर्णय खंडपीठाने बदलला

Goa Court: जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या जोसेफ सिक्वेरा, सिऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्त केले आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: २०१७ मधील चर्चित टायरोन नाझारेथ खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या जोसेफ सिक्वेरा, सिऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्त केले आहे. सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने तिघांना मुक्त केले.

२४ जून २०१७ रोजी कळंगुट फिश मार्केट परिसरात टायरोन नाझरेथ यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मे २०२३ मध्ये म्हापसा सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ सह ३४ अंतर्गत तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या आव्हानांवर न्यायमूर्ती अशिष चव्हाण यांनी वरील निर्णय दिला.

Court
Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

आरोपींच्या सांगण्यावरून ज्या शस्त्रांचा आणि जप्त करण्यात आलेल्या कपड्यांचा पंचनामा करण्यात आला, ती ठिकाणे सर्वांसाठी उपलब्ध होती. तसेच ही ठिकाणे मुलांच्या उद्यान व चर्चजवळील होती. त्यामुळे त्या वस्तू आरोपींच्याच आहेत, असे निर्णायाकरीत्या सांगता येत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. आरोपींना अटक झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने ओळख परेड घेण्यात आली, याबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण नव्हते.

Court
Goa Nightclub Fire: प्रसंगी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवरही होईल कारवाई, क्‍लबमधील आगीनंतर कडक पावले

‘साक्षीमध्ये गंभीर विरोधाभास’

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दिपेश नाईक (तक्रारदार), जॉर्ज नोरोन्हा आणि सिकंदर दास यांनी दिलेल्या साक्षीमध्ये गंभीर विरोधाभास असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच जॉर्ज नोरोन्हा हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता आणि परिसरातील चॅपेल, या ठिकाणी असलेला अंधार आणि इतर अडथळ्यांमुळे त्याला प्रत्यक्ष घटना पाहणे शक्यच नव्हते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com