

पणजी: गोमंतकीयांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारी एक मजबूत संघटना उभी करायची असेल, तर पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत घट्ट करण्याचा मूलमंत्र आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या केजरीवाल यांच्या या दुसऱ्या दिवसातील कार्यक्रमात राज्य पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बैठकांचे सत्र पार पडले. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि गोवा प्रभारी आतिषी उपस्थित होत्या.
जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर केजरीवाल यांच्या या दौऱ्याचे महत्त्व वाढले होते. या बैठकीदरम्यान केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांकडून सूचना ऐकून घेतल्या आणि राज्यात पक्षाचे संघटनात्मक अस्तित्व मजबूत करण्याच्या दृष्टिकोनाबद्दल काही सूचना केल्या.
यावेळी राज्यातील नेत्यांनी जमीन रूपांतरण, खाजन जमिनींचा विनाश, तलाव व नद्यांचे नुकसान यासंबंधी गंभीर चिंता व्यक्त केली. भाजपच्या पाठिंब्याने सुरू असलेला अनियंत्रित विकास गोव्याच्या पर्यावरणाला हानी पोहोचवत असल्याचे अधोरेखित केले.
१.लोकांशी असलेले नाते, हीच आमची ताकद आहे.
२. तळागाळापर्यंत संघटना मजबूत करा आणि गोव्याचा आवाज बना.
३. लोकांच्या समस्या ऐका, त्यांना त्यांचे मुद्दे मांडायला मदत करा
४. लोकांचे विषय तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचतील, याची खात्री करा.
५. लोकांना मदत करणे आणि त्यांची कामे करून देणे हाच राजकारणाचा खरा उद्देश.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.