

वास्को: पंजाबच्या धर्तीवर गोव्यातील जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात, असे आम्हाला वाटते. त्यासाठी गोव्यात ‘आप’चे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
ते म्हणाले, पंजाबमध्ये ‘आप’ सरकारने चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत. ज्याप्रकारे तेथील जनतेला १० लाखांचा आरोग्य विमा दिला जात आहे तसाच विमा गोव्यातील जनतेला मिळावा, अशी आमची इच्छा आहे. पंजाबमध्ये राज्य सरकारने शिक्षणावर भर देत सरकारी शाळांमध्ये बदल घडवून दाखवला आहे.
सरकारकडून मोफत वीज दिली जात आहे. तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्या केजरीवाल यांनी दाबोळी विमानतळावर आगमन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गोवा प्रभारी आतिषी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, प्रशांत नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, आपण गोव्यातील जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी आलो आहोत.
केजरीवाल म्हणाले, गोव्यातील लोक सध्या भाजप सरकारवर प्रचंड नाराज आहेत. गोव्यात नैसगिक साधनसंपत्तीवर गदा घालण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळेच चिंबल, पेडणे, मये येथील शेतकरी सुद्धा निदर्शने करीत आहेत. राज्यातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे गोव्यातील लोकांना ‘आप’ हाच आधार ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.