Travel Tourism Association of Goa: दादागिरी करणाऱ्या टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द करा! अन्यथा पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील

Travel Tourism Association of Goa: गोव्यात घडलेल्या प्रकारावर तो गैरसमजातून असे म्हणत त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत आहे.
Travel Tourism Association of Goa
Travel Tourism Association of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Travel Tourism Association of Goa: गोव्यात आलेल्या अमेरिकन क्रुझ पर्यटकांशी टॅक्सीवाल्यांनी दादागिरी केल्याने संपूर्ण जगात गोव्याविषयी एक वाईट संदेश गेलेला आहे. 14 रोजी जो प्रकार घडला तो गैरसमजातून असे म्हणत त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. मात्र, अशी दादागिरी करणाऱ्या टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द का केले जात नाहीत, असा खडा सवाल टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी केला आहे.

14 तारखेला अमेरिकन प्रवाशांशी ज्या टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केली त्यांना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा आशीर्वाद आहे, असे सांगितले जाते. या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टूर ऑपरेटरला दमदाटी करणारा टॅक्सी युनियनचा नेता ओंकार दुर्भाटकर हा आमोणकर यांचा माणूस म्हणून ओळखला जाते. याचसाठी आज आमोणकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.

तसेच, यापूर्वी 2017 मध्येही याच टॅक्सीवाल्यांनी एमपीटी क्रुझ टर्मिनसवर उतरलेल्या परदेशी पर्यटकांशी अशीच दादागिरी केली होती. यापूर्वी या युनियनला माजी मंत्री मिलिंद नाईक यांचा पाठिंबा होता. त्यावेळी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाकडून हे युनियन बेकायदेशीर शुल्क वसूल करत होते. मात्र, आमोणकर यांनी युनियनचा ताबा घेतल्यावर ही बेकायदेशीर वसुली बंद झाली होती.

Travel Tourism Association of Goa
Goa Taxi: वास्को सारखी घटना पुन्हा घडली तर... टॅक्सी चालकांना पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

कारवाईस वेळच मिळाला नाही

14 रोजीच्या त्या घटना एवढ्या कमी वेळेत घडल्या की त्यावेळी आम्हाला करवाई करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच घाबरलेले प्रवासी पुन्हा जहाजात जाऊन बसल्याने पोलिसांना काहीच करता आले नाही, अशी प्रतिक्रिया मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली.

नीलेश शहा, टीटीएजीचे अध्यक्ष-

गोव्यात हे प्रकार फक्त वास्को येथेच नव्हे तर दक्षिण गोव्यात कित्येक हॉटेलमध्ये घडतात. तुम्हाला फिरायचे असेल तर तुम्ही आमचेच वाहन वापरायला पाहिजे, अशी त्यांची सक्ती असते. ही अशी दादागिरी बंद न झाल्यास पर्यटक गोव्याकडे पाठ फिरविणे पसंत करतील. यासाठी कणखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com