विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्य नागरी सेवेतील (State Civil Service)बारा सरकारी अधिकाऱ्यांच्या (Government Officers) काल बदल्या झाल्या आहेत . संजीव गडकर यांची दक्षता खात्याच्या संचालकपदी, सुधीर केरकर यांची नागरी पुरवठा खात्याचे संचालक तर विनेश आर्लेकर यांची समाज कल्याण खात्याच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. गडकर हे अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त, केरकर हे कोलवाळ तुरुंगाचे अधीक्षक तर आर्लेकर हे माहिती आयोगाच्या सचिवपदी होते.(GOA: Transfers of 12 officers in the State Civil Service)
बदली करण्यात आलेले अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण) असे ः नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक एस. नाईक (दक्षिण गोवा ग्रामविकास एजन्सीचे प्रकल्प संचालक), दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीश कुट्टीकर (कोलवाळ तुरुंगाचे अधीक्षक), दक्षता खात्याचे संचालक संजीव सी. गावस देसाई (अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त), दक्षिण गोवा ग्रामीण विकास एजन्सीचे प्रकल्प संचालक देविदास गावकर (मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी), उद्योग व्यापार आणि वाणिज्य खात्याच्या सरव्यवस्थापक श्रीमती दर्शना नारूलकर (हस्त लघु उद्योग विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक), म्हापशाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ महादेव आरोंदेकर (गोवा राज्य माहिती आयोगाचे सचिव), राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मेल्विन वाझ (उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्याचे सरव्यवस्थापक), हस्त लघुउद्योग विकास मंडलाचे व्यवस्थापकीय संचालक नारायण गाड (म्हापशाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-३) तर शर्मिला झुझार्टे (राज्य निवडणूक आयोगाच्या सचिव) यांच्या बदलीचा आदेश कार्मिक खात्याचे अव्वर सचिव विशाल कुंडईकर यांनी काढले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.