येणारी गोवा निवडणूक (Goa Election) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवावी असे तत्वतः मान्य झाले असून यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी ही माहिती दिली असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रफुल्ल पटेल उद्या काँग्रेस नेत्यांना भेटणार असलयाचे त्यांनी सांगितले आहे. (Goa Election: Congress, NCP Goa forward will fight election in alliance)
दरम्यान, गोव्यातील काँग्रेस नेतेही याच बैठकीच्या निकालाची वाट पाहत असल्याची माहिती असून त्यासाठी दक्षिण गोव्यातील 20 पैकी फातोर्डा, दाबोळी आणि वास्को या तीन गटांच्या बैठका घेतलेल्या नाहीत. चर्चिल आलेमाव हे तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार हे जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे काल बाणावली गटाची बैठक घेण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या बाणावली गटाच्या बैठकीत माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यासह 5 जणांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून सुचविण्यात आली आहेत त्यात एडव्हीन बार्रेटो, रॉयला फर्नांडिस, ट्रॅव्हर कार्दोज आणि झिना परेरा यांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान जशी जशी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तश्या तश्या अनेक घडामोडी आणि राजकीय घटना राज्यात पाहायला मिळत आहेत. कालच राष्ट्रवादीचे (NCP) बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय नक्की झाला असून काल त्यांनी आपली कन्या वालांका आलेमाव हिच्यासह कोलकाता गाठून तृणमुलच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जी यांची मी भेट घेतली असून आमची प्रदीर्घ चर्चा झाली,असे चर्चिल आलेमाव यांनी 'गोमंतक'ला सांगितले. तृणमुल मध्ये कधी सामील होणार असे विचारले असता 1 डिसेंबरला मी गोव्यात पोहोचणार आहे. त्यानंतरच मी माझा निर्णय जाहीर करेल असे देखील त्यांनी सांगितले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार तृणमुलने चर्चिल आलेमाव यांना बाणावलीत आणि त्यांची कन्या वालांका हिला नावेलीत उमेदवारी देण्याचे नक्की केले आहे. चर्चिल बरोबर आणखीन काही त्यांचे समर्थक तृणमुलमध्ये प्रवेश करणार अशी माहिती प्राप्त झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.