सात मुली अनाथ झाल्या, गरीब कुटुंबाने कमवता पुरुष गमावला; गोव्यात रोजंदारी करणाऱ्या मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

Tragic Death News: जीतचे शव गोव्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी पैसे गोळा केले, त्यानंतर विमानाने गोव्यातून शव अर्जुनपूर येथे आणण्यात आले.
Poor family loses breadwinner Goa
Goa daily wage worker tragedyDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश: गोव्यात मजुरी करुन पोट भरणाऱ्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. भदोही जिल्ह्यातील अर्जुनपूर गावचा हा रहीवासी घरातील एकमेव कमवता पुरुष होता. जिला जीत असे या मजुराचे नाव असून, त्याच्या घराची आर्थिक स्थिती अगदीच बेताची आहे. त्याच्या जाण्याने सात मुली अनाथ झाल्या असून, घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जिला जीत गोव्यात मजुरी करुन स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट भरत होता. त्याच्या घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. गोव्यात मजुरी करत असताना त्याला सर्पदंश झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. जीतचे शव गोव्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी पैसे गोळा केले, त्यानंतर विमानाने गोव्यातून शव अर्जुनपूर येथे आणण्यात आले. शव पाहताच जीतच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.

Poor family loses breadwinner Goa
गोव्यात महिला न्यायाधीश आणि तिच्या पतीला धक्काबुक्की, रेस्टॉरंटमधून बाहेर हाकलंल; परस्परविरोधी गुन्हा नोंद

जीत यांचे शव घरी दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांच्या घरी गर्दी केली. जीत यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, त्यांच्या मुली (चंदा, बिंदू, इंदू, पायल, खुशबू, प्रियंका आणि ज्योती) अनाथ झाल्या आहेत. जीत त्यांच्या घरातील एकमेव कमवते पुरुष होते. त्याचे घर देखील साध्या बनावटीचे असून, अद्याप त्यांना सरकारी घर मिळालेले नाही.

शोकाकुल वातावरणात जिला जीत यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व गावकरी एकत्र आले होते. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी देखील जीत यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी ग्रामस्थांनी जीत यांना आर्थिक मदत तसेच, सरकारी घर देण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com