गोव्यात महिला न्यायाधीश आणि तिच्या पतीला धक्काबुक्की, रेस्टॉरंटमधून बाहेर हाकलंल; परस्परविरोधी गुन्हा नोंद

Goa Crime News: रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी त्यांचा विनयभंग देखील करण्याचा प्रयत्न केला व दोघांना परिसरातून बाहेर हालकण्यात आल, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Woman judge and husband assaulted in Goa
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यात उत्तर प्रदेश येथील महिला न्यायाधीश आणि तिच्या पतीला धक्काबुक्की करुन रेस्टॉरंटमधून बाहेर हाकलण्यात आले. याप्रकरणी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर, रेस्टॉरंट मालकाने देखील न्यायधीश महिला आणि तिच्या पती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शुक्रवारी (०५ सप्टेंबर) हणजूण येथील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

दीपांशी चौधरी असे या उत्तर प्रदेशातील न्यायाधीश महिलेचे नाव असून, नितीन लाल असे त्यांच्या पतीचे नाव आहे. दीपांशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “त्यांना व त्यांच्या पतीला शिवीगाळ करुन धमकी देण्यात आली.

रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी त्यांचा विनयभंग देखील करण्याचा प्रयत्न केला व दोघांना परिसरातून बाहेर हालकण्यात आले.” पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याचे दीपांशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Woman judge and husband assaulted in Goa
Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट खून प्रकरणातील आरोपीला विदेशात जाण्याची परवानगी; बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाणार

पोलिसांनी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग), ११५ (२) (जखमी करणे), ३५२ (सार्वजनिक शांतता भंग करणे) आणि ३५१ (३) (धमकावणे) या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

तसेच, रेस्टॉरंट मालक समर्थ सिंगल यांनी देखील दीपांशी आणि लाल यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दाम्पत्याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दाम्पत्याविरोधात बीएनएस ३५२, १२६ (२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Woman judge and husband assaulted in Goa
Goa Sand Mining: महिन्याभरात पाऊस थांबेल, विकासकांची बांधकामे वेग पकडतील; वाळू समस्येचे ‘गँग्रीन’

हणजूण समुद्रकिनाऱ्याजवळ हे रेस्टॉरंट असून, पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांबरोबर दाम्पत्याने वाद घातला व शिवीगाळ केल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. रेस्टॉरंटचे पार्किंग सशुल्क सेवा असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायाधीश महिला आणि तिच्या पतीला रेस्टॉरंटमध्ये कार पार्क करण्यासाठी जागा मिळाली नाही. यावरुन वादाला तोंड फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com