Goa News: गोमंतकीयांत साईभक्तीची अनोखी परंपरा

Goa News: गोवाच्या युवकांनी घुमट आरतीचे सादरीकरुन शिर्डीतील साईभक्तांना मंत्रमुग्ध केले.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News: साईबाबांचे आणि गोव्याचे नाते अगदी अनोखे आणि जवळचे असून साईभक्तीची परंपरा अजूनही कायम आहे. साईसेवा गोव्यात पाहिली तशी इतरत्र कुठेही अनुभवली नाही. काल साईमंदिरी रंगमंचावर माझ्या सासुरवाडी (गोवा)च्या युवकांनी घुमट आरती सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले, असे उद्‌गार शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे माजी ट्रस्टी गोपीनाथ (अण्णा) बयाजीराव कोते पाटील यांनी काढले.

शिर्डी येथे अखिल गोमंतक साईसेवा मंडळ गोवाच्या सहकार्याने श्री साईतोणेश्वर घुमट आरती मंडळ विठ्ठलापूर-साखळीतील पथकाने साईबाबा मंदिरात घुमट आरती सादर प्रसंगी कलाकारांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कोते पाटील बोलत होते.

Goa News
Goa Culture: ''दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो'' सावईवेरेत धेंडलोत्सव उत्साहात

व्यासपीठावर वास्कोचे आमदार दाजी साळकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, तसेच वाहतूक निरीक्षक दामोदर माशेलकर, वाहतूक सहनिरीक्षक शिवानंद पेडणेकर, माशेलचे पंच सिध्दार्थ गाड, अखिल गोमंतक साईसेवा मंडळाचे अध्यक्ष वज्राधर कळंगुटकर, खजिनदार प्रेमानंद कोचरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रामानंद तारी यांनी केले. प्रेमानंद कोचरेकर यांनी आभार मानले.

घुमट आरती कलाकारांचा गौरव

श्री साईतोणेश्वर घुमट आरती पथकातील उज्ज्वल हळर्णकर, समीर माजिक विठ्ठल सावंत, पांडुरंग महाले, अभिषेक वांतेकर, दिवेश नाईक, सितम तारी, विशाल राणे, शंभू नाईक, रुपेश जोगळे, रुनल च्यारी, सिध्दार्थ नाईक, दशॅन च्यारी, अश्वेक फातर्पेकर, एकांत सावंत, प्रवीण तारी या कलाकारांचा हस्ते साई प्रतिमा व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com