मदतीचा हात पुढे केला अन् मिळाली बंदुकीची धमकी! पर्यटकांकडून आसगावात स्थानिकांना 'एअर गन'चा धाक, काही काळ तणावाचे वातावरण

Goa Tourists Air Gun Threat: बार्देश तालुक्यातील आसगाव येथे रविवारी दुपारी एका भाड्याच्या टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना मदत करण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांनाच पर्यटकांनी थेट बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची धक्कादायक घटना घडली.
Goa Tourists Air Gun Threat
Goa Tourists Air Gun ThreatDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बार्देश तालुक्यातील आसगाव येथे रविवारी दुपारी एका भाड्याच्या टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना मदत करण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांनाच पर्यटकांनी थेट बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची धक्कादायक घटना घडली.

या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये वाद निर्माण झाला आणि परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे संशयित पर्यटक अलाहाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा नोंद झाला नव्हता.

Goa Tourists Air Gun Threat
Goa Monsoon: 49 दिवसांतील पावसापैकी 50 टक्‍के केवळ 8 दिवसांत, आतापर्यंत 38.93 इंचांची नोंद; तूट 37 टक्‍क्‍यांवर

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, प्राथमिक तपासात ज्या बंदुकीमुळे हा सगळा वादंग निर्माण झाला ती केवळ ‘एअर गन’ असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार नेमका कोणत्या कारणातून आणि कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास पोलिस करत आहेत.

Goa Tourists Air Gun Threat
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

टॅक्सी गटारात अडकली अन्...

या पर्यटकांची टॅक्सी गटारामध्ये अडकली होती. यावेळी मदतीसाठी गेलेल्या स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांत बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करत संबंधित तीन पर्यटकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या वादादरम्यान स्थानिकांनी पर्यटकांकडून जे हत्यार हस्तगत केले होते, ते पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com