Goa: गोव्यातील 30 पर्यटक अडकले काश्मीरमध्ये! अमृतसर विमानतळ बंद; परतीसाठी प्रयत्न सुरू

Goa tourists in Kashmir: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दोन पर्यटक गट काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
Goa tourists in Kashmir
Tourists stranded in kashmirDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दोन पर्यटक गट काश्मीर दौऱ्यावर गेले होते. मात्र, परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने हे दोन्ही गट तेथे अडकले आहेत.

एकूण ३० पर्यटकांपैकी १५ जणांचा एक गट सध्या अमृतसरमध्ये अडकलेला असून तेथील विमानतळ बंद झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. या गटाने खासगी टूर ऑपरेटरमार्फत प्रवास केला होता. त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Goa tourists in Kashmir
Pakistan Drone Attacks: पाकिस्तानची भेकड खेळी! 400 ड्रोन हल्ले लष्कराने परतवले; नागरी विमानांची पाककडून ढाल

दुसऱ्या गटातील पर्यटकही काश्मीरमध्येच अडकले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक प्रशासन व गोवा सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Goa tourists in Kashmir
India Pakistan War: गोव्यात ड्रोन उडवण्यास बंदी, मच्छिमारांवरती निर्बंध! भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांकडून सज्‍जतेचा आढावा

दरम्यान, पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी परिस्थिती स्थिर होईपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com