दारूच्या नशेत विहिरीची 'सफर'; 'स्टंट' पडला महागात; थेट विहिरीत कोसळला पर्यटक! अग्निशमन दलाने वाचवला जीव!

Goa Tourist Rescue: वागातोर ५० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या केतन राज (वय ३१, रा. बंगळुरू, कर्नाटक) या पर्यटकाला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
Goa Tourist Rescue
Goa Tourist RescueDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: वागातोर येथील एका रेस्टॉरंटजवळ असलेल्या ५० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या केतन राज (वय ३१, रा. बंगळुरू, कर्नाटक) या पर्यटकाला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत विहिरीच्या कठड्यावर चढला असता, त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला होता.

ही घटना शुक्रवारी पहाटे २.३८ च्या सुमारास घडली. बंगळुरूहून आलेल्या पर्यटकांचा एक गट वागातोर येथील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता.

या पार्टीत केतन राज याच्यासह त्याच्या काही मित्रांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते. पार्टी संपवून रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर हे सर्वजण मद्यधुंद अवस्थेत मौजमस्ती करत रस्त्यावरून जात होते.

Goa Tourist Rescue
Goa Crime: सुर्लकर खून प्रकरण: एका बाजूला आक्रोश, दुसऱ्या बाजूला आशेची धडपड! कोर्टात भावनांचा कल्‍लोळ

त्याचवेळी केतन जवळच असलेल्या विहिरीपाशी गेला आणि अंदाजे दीड मीटर उंची असलेल्या विहिरीच्या कठड्यावर चढला. मात्र, प्रचंड नशेमध्ये असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट ५० फूट खोल विहिरीत कोसळला.

Goa Tourist Rescue
Goa Agriculture: आठवडाभराच्या दमदार पावसानं बळीराजा सुखावला! शेतीकामांना वेग; कृषी उपसंचालकांकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

केतन विहिरीत पडल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी एकच आरडाओरड केली. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व विहिरीत बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com