Goa Tourism: यंदाच्या पर्यटन हंगामातील उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान 7 डिसेंबरला येणार

गोवा पर्यटन शिष्टमंडळ उझबेकिस्तानातील पर्यटन मेळ्यात झाले होते सहभागी
Goa Tourism Uzbekistan Charter Flights
Goa Tourism Uzbekistan Charter Flights Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: गोव्याच्या पर्यंटन हंगामात यंदा उझबेकिस्तानमधून पहिली चार्टर फ्लाईट 7 डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहे. यातून परदेशी पर्यटक गोव्यात येतील. यातून पर्यटन वाढीसह आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याचा उद्देश असतो.

चालू असलेल्या पर्यटन हंगामातील पहिले चार्टर उड्डाण उझबेकिस्तानमधून उतरेल, जे भारतासोबतच्या सहकार्यातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल आणि पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतील वाढत्या संबंधांचे प्रदर्शन करेल.

Goa Tourism Uzbekistan Charter Flights
Nawazuddin Siddiqui: 'इफ्फी'मध्ये अयोग्य लोकांना बोलवू नका; कलात्मक चित्रपट बनवणाऱ्यांना आमंत्रण द्या!

ही फ्लाईट ७ डिसेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता गोव्यात येईल. आणि त्याचे प्रस्थान दुपारी 12.20 वाजता होईल. या फ्लाईटमधून येणार्‍या पाहुण्यांना भेटून त्यांचे स्वागत करेन, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

खंवटे म्हणाले की, उझबेकिस्तानच्या पहिल्या चार्रटचे गोव्यात स्वागत आहे. दोन्ही देशातील दीर्घ आणि फलदायी सहकार्याची ही सुरवात असेल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही उझबेकिस्तानचे सरकार आणि नागरिकांकडून सर्व सहकार्याची अपेक्षा करतो.

दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन बंध मजबूत करणे, हाच यापाठीमागचा उद्देश आहे, असेही खंवटे म्हणाले.

दरम्यान, गोवा पर्यटन शिष्टमंडळ नुकतेच उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यात सहभागी झालो होतो. ज्यात उद्घाटन समारंभाला उझबेकिस्तानमधील भारताचे राजदूत मनिष प्रभात उपस्थिती होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com