Goa Monsoon 2023: मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा....पण 'त्या' दोघींचे केवळ दैव बलवत्तर म्हणून...

कुळण येथे झाड पडून हानी: ‘मुसळधार’मुळे जनजीवन त्रस्त
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Goomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 गेल्या दहा-बारा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आता कहर केला असून, आज (बुधवारी ) मुसळधार पावसाने डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण येथे दुपारी गुलमोहोराचे झाड रस्त्यावर कोसळले.

केवळ दैव बलवत्तर दुचाकीवरील दोन महिला किरकोळ जखमी होता या दुर्घटनेतून सुदैवाने बचावल्या. झाडाची फांदी निसटती पडल्याने दुचाकीची काही प्रमाणात मोडतोड झाली, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023: राज्यात कोसळधार! दरड, झाडं कोसळून विविध ठिकाणी नुकसान

कुळण येथे रस्त्यावर झाड कोसळले, त्याचवेळी वाळपई येथील शबरीन शेख आणि नहिमा शेख या दोन महिला स्कूटरवरुन साखळीच्या दिशेने जात होत्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दोघी महिला झाडाखाली येण्यापासून बचावल्या.

या घटनेची माहिती मिळताच लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून रस्त्यावर पडलेले झाड कापून रस्ता मोकळा केला. तोपर्यंत साधारण पाऊणतास या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर तर सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. दिवसभर आकाशात ढग दाटून राहिले होते. जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Goa Monsoon 2023
Colvale Central Jail: कैद्यांनी सादर केलेल्या याचिकांबाबत महत्वाची बातमी; खंडपीठाकडून...

नद्यांच्या पातळीत वाढ : मुसळधार पावसामुळे डिचोलीत नदीनाल्यांचे पाणी वाढले असून, बहूतेक भागात जलमय चित्र दिसून येत आहे. विविध ठिकाणी गटारे तुंबली आहेत.

जोरदार पावसामुळे डिचोलीसह वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, नद्या ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com