

chief minister on goa tourism: नव्या वर्षाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीयांना आणि जगभरात पसरलेल्या गोवा प्रेमींना नवीन वर्षाच्या म्हणजेच २०२६च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने त्यांनी गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या पर्यटन क्षेत्रावर भाष्य करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की, गेल्या काही दिवसांत, विशेषतः २३ डिसेंबरपासून गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली आहे. जागतिक परिस्थिती, इतर राज्यांमधील स्पर्धा आणि अंतर्गत घटकांमुळे हा परिणाम झाला असला तरी, त्यांनी याकडे सकारात्मकतेने पाहण्याचे आवाहन केले आहे. "पर्यटन हा गोव्याचा कणा आहे, आणि लहान-मोठ्या चढ-उतारांमुळे आपण खचून जाता कामा नये," असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सावंत यांनी राज्यातील सर्व स्टेकहोल्डर्स (हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि स्थानिक जनता) यांना आवाहन केले की, त्यांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे स्वागत गोव्याच्या पारंपारिक आदरातिथ्याने करावे. पर्यटकांना गोव्यात सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटेल, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याची 'हॉस्पिटॅलिटी' हीच आपली खरी ओळख असून ती टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील गती पुन्हा मिळवण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरूच आहेत, मात्र जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. नवीन वर्षात सामूहिक प्रयत्न आणि सदिच्छांच्या जोरावर गोवा पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजलेले राज्य म्हणून आपली ओळख अधिक पक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.