Goa Tourism: गोव्यासाठी आनंदाची बातमी! पर्यटन हंगाम ठरला फायदेशीर, पर्यटकांची 'विक्रमी' संख्या; वाचा आकडेवारी

Goa tourist statistics: ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गोव्यात एकूण १,०४,११,१९६ पर्यटक दाखल झाले आहेत.
Goa tourist statistics
Goa TourismCanva
Published on
Updated on

पणजी: ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गोव्यात एकूण १,०४,११,१९६ पर्यटक दाखल झाले आहेत. यामध्ये ९९,४१,२८५ देशी पर्यटक, तर ४,६७,९११ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यावरून पर्यटन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार हा हंगाम गोव्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पर्यंत नोंदणीकृत ७५,९७३ हॉटेल खोल्या उपलब्ध आहेत. मात्र, मागील दोन हंगामातील हॉटेल, ‘होम स्टे’ आणि इतर निवास सुविधांची सरासरी गर्दी जाणून घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही उत्तर पर्यटन विभागाने दिले.

Goa tourist statistics
Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मिळणार उभारी! अर्थसंकल्पात ‘होमस्टे’ व्यवसायाला प्रोत्साहन; मंत्री खंवटेंची माहिती

पर्यटन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १ कोटी ४ लाखांहून अधिक असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली होती. सोबत ३५ टक्के रोजगार निर्मिती झाल्‍याची पुष्टीही त्यांनी जोडली होती .

Goa tourist statistics
Goa Tourism: 'चटईची जागा शॅक्सनी घेतली, चहाच्या जागी दारु आली'; बीचवर आता गोमंतकीय उबदारपणा उरलाय का?

पर्यटनाचा नवा उच्चांक!

गोव्यात तीन महिन्यांत आलेल्या १ कोटीहून अधिक पर्यटकांमुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. परंतु, वाढत्या पर्यटकांमुळे उपलब्ध निवास व्यवस्था आणि सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com