Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मिळणार उभारी! अर्थसंकल्पात ‘होमस्टे’ व्यवसायाला प्रोत्साहन; मंत्री खंवटेंची माहिती

Goa Homestay Business: केंद्रीय अर्थसंकल्पात कौशल्य विकास, होमस्टे व्यवसायासाठी मुद्रा कर्ज आणि प्रमुख पर्यटन स्थळांसाठी सुधारित पायाभूत सुविधा यावर भर देण्यात आला आहे.
Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार उभारी! अर्थसंकल्पात ‘होमस्टे’ व्यवसायाला प्रोत्साहन; मंत्री खंवटेंची माहिती
Goa Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय अर्थसंकल्पात कौशल्य विकास, होमस्टे व्यवसायासाठी मुद्रा कर्ज आणि प्रमुख पर्यटन स्थळांसाठी सुधारित पायाभूत सुविधा यावर भर देण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होईल आणि स्थानिक व्यवसायांना अधिक संधी उपलब्ध होतील, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या वर्षीच्या अर्थसंकल्पात आध्यात्मिक आणि वेलनेस पर्यटनावर विशेष भर दिला आहे, जो गोव्याच्या (Goa) पर्यटन धोरणाशी सुसंगत आहे. याशिवाय, वर्धित कनेक्टिव्हिटी आणि सुव्यवस्थित ई-व्हिसा सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन वाढण्याची अपेक्षा आहे. गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांसोबत कार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असेही मंत्री खंवटे म्हणाले.

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार उभारी! अर्थसंकल्पात ‘होमस्टे’ व्यवसायाला प्रोत्साहन; मंत्री खंवटेंची माहिती
Goa Tourism: गोव्याच्या समृद्ध वारशाची झळाळी; ‘ओटीएम’मध्ये पर्यटनाच्या वचनबद्धतेचे प्रभावी प्रदर्शन

पर्यटनासोबतच, आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील (Budget) घोषणा आशादायक आहेत. डिजिटल पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य प्रशिक्षण आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन यामुळे भारतातील विशेषतः गोव्यातील तरुण उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. डिजिटल जोडणी अधिक मजबूत झाल्याने दूरस्थ काम आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांसाठी भारताचे आणि गोव्याचे आकर्षण वाढेल. यामुळे गोवा एक जागतिक टेक आणि इनोव्हेशन हब म्हणून पुढे येण्याची संधी मिळेल, असे मंत्री खंवटे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com