Goa Cruise Tourism: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगामाची धमाकेदार सुरुवात, 'कॉर्डेलिया एम्प्रेस' 1,050 प्रवाशांसह दाखल

Cordelia Empress Arrives In Goa: हंगामाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची आशा आहे.
Cordelia Empress Arrives In Goa
Goa Cruise TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cruise Tourism: पर्यटन व्यवसायाला गती देण्यासोबत जागतिक स्तरावर गोव्याची ओळख क्रूझ पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. मुरगाव बंदर प्राधिकरण (MPA) येथे क्रूझ पर्यटनाच्या हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या हंगामाच्या पहिल्याच दिवशी 'कॉर्डेलिया एम्प्रेस' हे भव्य क्रूझ जहाज 1,050 प्रवाशांना घेऊन गोव्यात दाखल झाले.

दरम्यान, हंगामाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची आशा आहे. हे सर्व पर्यटक गोव्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देतील, स्थानिक बाजारपेठांमधून खरेदी करतील आणि गोव्याच्या संस्कृती व खाद्यपदार्थांचा अनुभव घेतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.

Cordelia Empress Arrives In Goa
Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

यंदाच्या हंगामासाठी क्रूझ लाईनरचे निश्चित बुकिंग मुरगाव बंदर प्राधिकरणाचे वाहतूक व्यवस्थापक जेरोम क्लेमेंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी क्रूझ जहाजांचे बुकिंग मोठ्या संख्येने झाले आहे. आतापर्यंत 31 देशांतर्गत (Domestic) आणि 12 आंतरराष्ट्रीय (International) क्रूझ लाईनरनी मुरगाव बंदराला त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर निश्चित केले.

तसेच, या मोठ्या संख्येतील बुकिंगमुळे हा हंगाम मागील वर्षांच्या तुलनेत अधिक यशस्वी आणि व्यस्त राहील असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, अजूनही अनेक क्रूझ लाईनर गोव्याकडे आकर्षित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी 10 आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे गोव्यात दाखल होऊ शकतात, ज्यामुळे हा हंगाम अधिक यशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Cordelia Empress Arrives In Goa
Goa to Mumbai Cruise: गोव्यातील पर्यटकांवर महाराष्ट्राचे ‘जाळे’! गोवा-मुंबई क्रुझ सेवा दृष्टीपथात, 'द्वारके'पर्यंत समुद्र सफर

कॉर्डेलिया एम्प्रेसच्या आगमनाने सुरु झालेला हा हंगाम गोव्याच्या (Goa) पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक संकेत देतो. मोठ्या संख्येने निश्चित बुकिंग आणि भविष्यातील शक्यतांमुळे गोव्याच्या क्रूझ पर्यटनाला एक नवी दिशा मिळेल.

Cordelia Empress Arrives In Goa
Goa Cruise Terminal: गोव्यात होणार नवे क्रूझ टर्मिनल; ड्युटी फ्री शॉप, लाउंज, फूड कोर्ट सारख्या मिळणार सुविधा

याशिवाय, पर्यटन (Tourism) व्यावसायिक, टॅक्सी चालक, स्थानिक विक्रेते आणि इतर सेवा पुरवणाऱ्या सर्वांसाठी हा हंगाम खूप महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा आहे. गोवा सरकार आणि बंदर प्राधिकरण यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे क्रूझ पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, ज्यामुळे गोव्याची जागतिक पर्यटन नकाशावर एक खास ओळख निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com