OYO Accelerator Program: गोव्यातील स्टार्टअप्स, व्यावसायिकांसाठी खूशखबर! 500 हॉटेल जोडून 5000 रोजगार निर्मितीचे लक्ष्य

OYO Accelerator Program Goa: गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी ओयोच्या एक्सलेरेटर कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी ओयोचे ऑफिसर वरुण जैन उपस्थित होते.
OYO Accelerator Program Goa
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

OYO Accelerator for Goa Hotels

पणजी: गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी ओयोच्या एक्सलेरेटर कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या प्रोग्रॅमनुसार हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे. यावेळी ओयोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वरुण जैन उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये मंत्री खंवटे यांनी ओयो एक्सलेटर प्रोग्रॅमच्या पाच लाभार्थ्यांना 25 लाख रुपयांचे वाटप केले. गोवा पर्यटन विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या उपक्रमाद्वारे पुढील एका वर्षात राज्यात 500 हून अधिक हॉटेल्स जोडण्याची आणि 5,000 हून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची योजना आखली जात आहे.

एक्सीलरेटर कार्यक्रमाचा भाग म्हणून ओयो पहिल्या श्रेणीतील तसेच छोट्या हॉटेल व्यवसायिकांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी, ग्राहक वाढवण्यासाठी मार्गदर्शन, तंत्रज्ञान, कुशल व्यवस्थापन आणि आर्थिक सहाय्य करून कमाई वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

OYO Accelerator Program Goa
Goa Tourism: कॅसिनोत मारवाडी, महागड्या रुम्स आणि उद्धट चालक; निवृत्त लष्कर अधिकाऱ्याने गोवा पर्यटनाबाबत मांडले मत

ते पुढे म्हणाले की, "हे व्यावसायिक आपले व्यवसाय वाढवण्यासाठी भारतातील ओयोची 15,000 खाती आणि 10,000 पेक्षा जास्त ट्रॅव्हल एजंट्सच्या नेटवर्कचा लाभ घेऊ शकतील."

येथे प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार खवंटे म्हणाले की, एक्सीलरेटर कार्यक्रम फक्त आमच्या शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीकोनाशी संलग्न नाही तर लहान तसेच मध्यम व्यवसायांना धोरणात्मक मार्गदर्शन, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि आर्थिक सहाय्याच्या मदतीने व्यवसाय वाढवण्यासाठी व्यासपीठ देखील प्रदान करतो.

"हा उपक्रम वेगळेपण, सांस्कृतिक वारसा जपत जागतिक पर्यटन स्थळांमध्ये गोवा आघाडीवर राहील याची खात्री करण्याची आमची जबाबदारी अधोरेखित करतो" असे मंत्री खवंटे यांनी सांगितले.

OYO Accelerator Program Goa
Illegal Tourism Practices: गोव्यातील 'बेकायदा' गोष्टींवर राहणार कडक नजर? साहसी पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी

ओयोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वरुण जैन म्हणाले, "आम्ही गोव्यातील महत्त्वाकांक्षी हॉटेलवाल्यांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत, त्यांना त्यांच्या व्यावसायिक क्षमतेची जाणीव करून देण्यासही मदत करू.

गोव्यातील या कार्यक्रमाच्या यशाबद्दलचा आमचा आत्मविश्वास इतर राज्यांमुळे आहे जिथे या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे," अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com