Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Tourist In Goa: गोव्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली तरी व्यावसायिकांना याचा लाभ होत नाही
Tourist In Goa: गोव्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली तरी व्यावसायिकांना याचा लाभ होत नाही
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

ऑगस्टो रॉड्रिग्ज

पणजी : गोव्यात पर्यटकांचा ओघ कमी झाल्याची आकडेवारी समोर आली असतानाच गोव्यातील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. गोव्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली तरी व्यावसायिकांना याचा लाभ होत नाही.

ट्रेल ब्लेझर टुर्स इंडियाचे महाव्यवस्थापक ऑर्लँडो न्युन्स म्हणतात, उत्तर गोव्यात मी नुकताच फेरफटका मारून आलो. भारताच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांची किनाऱ्यांवर गर्दी आहे. पण शॅक्स, रेस्टॉरंट ओस पडलेत. यातून असे दिसते की हे टुरिस्ट वडावाप खातात आणि संध्याकाळी नाईटक्लबमध्ये जातात.

आज गोव्यात दिसणारे पर्यटक हे काही भरपूर पैसे कमावणारे आणि तेवढेच पैसे उडवणारे नाहीत. गोव्यात दिसणारा पर्यटकवर्ग रस्त्याच्याकडेला मिळणारे खाद्यपदार्थ खाऊन खूश होणारा किंवा बसने प्रवास करणारा आहे, असे अर्दन एक्सपिरिअन्सेसच्या रेश्मा अल्वेस यांनी सांगितले.

पर्यटक असून देखील व्यवसायात मंदी कायम आहे. गोव्यात यंदाच्या पर्यटन हंगामातील पाहिलं विमान उतरल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा केली जात होती मात्र त्यातली एकही गोष्ट आत्तातरी खरी होताना दिसत नाहीये.

कदाचित यूके, इटली आणि स्कॅन्डिनेव्हिया इथून विमानं उतरल्यानंतर गोव्यातील पर्यटनाची हवा काहीशी बदलण्याची शक्यता आहे. सध्या समुद्र किनाऱ्यावर चक्कर टाकताच किनारा भरलेला नक्कीच दिसेल मात्र तिथले शॅकचे मालक आणि रेस्टॉरंट्स अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

Tourist In Goa: गोव्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली तरी व्यावसायिकांना याचा लाभ होत नाही
Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, Viral Video

बऱ्याच मालकांना असे वाटते की भारतीय पर्यटकांच्या अपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत आणि ते देत असलेल्या आदरातिथ्याला पर्यटकांकडून फारसं महत्व दिलं जात नाही. दिवाळीच्या काळात अनेक भारतीय पर्यटक गोव्यात आले होते मात्र ते केवळ स्ट्रीट फूडपुरते मर्यादित होते.

शॅकचे मालक अशा पर्यटकांच्या प्रतीक्षेत नाहीत. शॅक्सना ज्या पर्यटनामुळे फायदा होतो असे पर्यटक अजून गोव्यात येणं बाकी आहे आणि भारतीय पर्यटक शॅक्समध्ये जाऊन बसण्याच्या अद्याप तरी विचार करताना दिसत नाहीत.

“भारतीय आणि परदेशी नागरिकांमध्ये सांस्कृतिक विभाजन असल्याचे म्हणणे बरोबर आहे की नाही हे मला माहीत नाही. पण युरोपमध्ये हिवाळा सुरू झाल्यानंतर गोव्यातील पर्यटनाचे चित्र बदलू शकते", असे शॅकचा मालक असलेल्या रॉकने सांगितले. पोलंडमधून आत्ता 184 पर्यटक आले आहेत आणि येणाऱ्या काळात आणखी 368 पर्यटक गोव्यात येतील, अशी आशा एका हॉटेल मालकाने व्यक्त केली.

३ नोव्हेंबर रोजी युकेमधून पर्यटकांना घेऊन एक चार्टर विमान गोव्यात उतरलं होतं आणि आता ८ नोव्हेंबरला पोलंडहून आणखीन एक विमान उतरणार आहे. २०२३ मध्ये गोव्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ लाखांच्या घरात पोहोचली होती. तर परदेशी पर्यटकांची संख्या साडे चार लाख ऐवढी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com