Goa Tourism : गोव्याच्या पर्यटनाची पुन्हा देशी पर्यटकांवरच मदार!

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम युरोपवर झाला असून, रशिया आणि युक्रेन येथील पर्यटक गोव्यात फारसे येणार नाहीत, अशी माहिती पर्यटन खात्याकडून देण्यात आली आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism : गोव्याचा यंदाचा पर्यटन हंगाम पुन्हा देशी पर्यटकांवरच अवलंबून राहणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम युरोपवर झाला असून, रशिया आणि युक्रेन येथील पर्यटक गोव्यात फारसे येणार नाहीत. असे असले तरी आम्ही पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी नव्या क्लृप्त्या आणि साधनसुविधांवर भर देणार असल्याची माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली आहे.

यंदा पावसाळात मोठ्या संख्येत पर्यटक राज्यात आल्याने पर्यटन क्षेत्राशी निगडित घटकांना फायदा झाला आहे. लांब विकेंडच्या सुट्टींचा फायदा राज्‍याला झाला, कारण पर्यटकांनी गोव्याकडे कल केला, असे मत देसाई यांना व्यक्त केले. देशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या आठवड्याच्या अखेरीस अहमदाबाद, गुजरात येथे कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

Goa Tourism
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीनिमित्त राज्यात इंधन वाहन खरेदीला ‘वेग’

अतिक्रमण हटवण्याची मोहीम लवकरच

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सरकारी मालमत्तेत केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी पर्यटन खात्याकडून सर्वेक्षण होती घेतले जाणार आहे. उत्तर गोव्यातील केरी ते दक्षिणेत काणकोणपर्यंत समुद्रकिनाऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, असे निखिल देसाई यांनी सांगितले.

300 कोटींच्या साधनसुविधा

पर्यटन उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी नवीन साधनसुविधा तयार केली जात आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून सुमारे 300 कोटी रुपयांचे प्रकल्प राज्याच्या विविध ठिकाणी येत आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com