Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीनिमित्त राज्यात इंधन वाहन खरेदीला ‘वेग’

इलेक्ट्रिकची ‘गती’ मंदावली : एकूण 7120 वाहनांची विक्री
E vehicle in Goa
E vehicle in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीनिमित्त राज्यात वाहन खरेदीला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे यंदा दिसून आले. पेट्रोल-डिझेलच्या इंधन वाहनांच्या तुलनेत मात्र इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट झाले आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट असले तरीही सद्यस्थितीत वाहन खरेदी होत असल्याने व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला.

शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. चतुर्थीचा मुहूर्त पाहून तर ग्राहकांमधील खरेदीचा उत्साह कितीतरी पटीने वाढलेला दिसून येतो. त्यामुळे या कालावधीत वाहन खरेदीलाही ग्राहकवर्गाची पसंती असते. दुचाकीबरोबरच हल्ली घराघरात फोर व्हीलर दिसून येत असून, मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातही अनेक चारचाकी वाहनांची किंमत असल्याने या वर्गाकडूनही चारचाकी खरेदी केली जाते. मात्र, राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान बंद केल्याने इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी कमी झाली.

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांसाठी काही योजना राबविल्या जात आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे.

E vehicle in Goa
Goa Crime : दक्षिण गोव्यात केवळ 2 महिन्यांमध्ये 5 खून

इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढेल

लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे समजल्यानंतर मंदावलेली इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी पुन्हा वाढेल असा विश्‍वास ॲथर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करणजीतसिंग यांनी व्यक्त केला आहे.

मंदीचे सावट

जुलैमध्ये एकूण 4,565 वाहनांची नोंदणी झाली होती. 7,120 वाहनांची खरेदी 31 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर झाली. यात 1,839 चारचाकी आणि 4,196 दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com