GTDC Tambadi Surla Trekk: गोवा पर्यटन विकास महामंडळाची तांबडी सुर्ल ट्रेकिंग मोहिम बंद

गेल्याच आठवड्यात दिमाखात झाला होता प्रारंभ; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
Trekking expedition to Tambdi Surla waterfalls
Trekking expedition to Tambdi Surla waterfallsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism Development Corporation Tambadi Surla Trekk: गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे (Goa Tourism) तांबडी सुर्ल येथील धबधबा परिसरात गेल्याच आठवड्यात ट्रेकिंग मोहिमेला सुरवात केली होती. दरम्यान, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर हा ट्रेक आता बंद करण्यात आला आहे, अशी माहिती आहे.

Trekking expedition to Tambdi Surla waterfalls
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचे 'वर्षा पर्यटन'; केसरवाल धबधब्याला दिली भेट

मोले अभयारण्यातील आरएफओ यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या भागात सतत पाऊस सुरू आहे. हा भाग घनदाट आहे. या ट्रेकिंगमध्ये एक ओहोळ पार करावा लागतो. त्याला पुर येत आहे. त्यामुळे कोणतीची अनुचित घटना घडू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पुन्हा हा ट्रेक सुरू करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा यामुळे हा ट्रेक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवार 7 जुलैपासून हा ट्रेक बंद करण्यात आला आहे, अशी माहिती आहे. पाऊस कमी झाल्यावर याबाबतची अद्ययावत माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

या ट्रेकिंग मोहिमेची पहिली बॅच 2 जुलै रोजी रवाना झाली होती. पर्यटन विकास महामंडळचे चेअरमन आमदार डॉ. गणेश गांवकर यांनी झेंडा फडकवुन याची सुरवात केली होती. या मोहिमेत तांबडी सुर्ल (tambdi surla) येथील शिव मंदीरालाही भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com