Goa CM Pramod Sawant at Kesarval Waterfalls
Goa CM Pramod Sawant at Kesarval Waterfalls Twitter

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचे 'वर्षा पर्यटन'; केसरवाल धबधब्याला दिली भेट

सोयी सुविधांची घेतली माहिती
Published on

CM Pramod Sawant At Kesarval Waterfall: राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरवात केल्यानंतर सर्व नद्यांना दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे नद्या, मोठे ओहोळ यांवरील धबधबेदेखील प्रवाहीत झाले आहेत. त्या पार्श्वभुमीवर राज्यात वर्षा पर्यटनाला सुरवात झाली आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आज, शुक्रवारी केसरवाल धबधब्याला भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा पर्यटनाच्या अनुषंगाने या धबधबा ठिकाणाची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार अँटिनिओ वास आणि अधिकारीदेखील उपस्थित होते. येथील सोयी-सुविधांची पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांना सोयीसुविधांच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com