Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Rising diabetes in youth: वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर युवा पिढीसाठी ती फार गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. तेजस कामत यांनी केले.
Dr Tejas Kamat diabetes claim
Dr Tejas Kamat diabetes claimDainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: गोवा हे मधुमेहासाठी भारताची राजधानी बनली आहे. कारण आज गोव्यात मधुमेह रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या पाच दहा वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्येही हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर युवा पिढीसाठी ती फार गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. तेजस कामत यांनी केले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्देश तालुका, थिवी ग्राम पंचायत व इंडियन मेडिकल अससोसिएशन बार्देश शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने थिवी पंचायत सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात कामत बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष कौठणकर, शिवदास कांबळी, गीता शेळके, सलीम इसानी, डॉ. रचना हलर्णकर उपस्थित होते.

Dr Tejas Kamat diabetes claim
Diabetes Prevention: डायबेटिस होऊ नये म्हणून काय करावे?

मधुमेहविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येकाने वयाची तिशी ओलांडल्यावर वर्षातून किमान एकदा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहावे. आजच्या घडीला मधुमेहग्रस्त रुग्णांपेक्षा प्रि डायबेटीक व्यक्ती खूप आहेत.

Dr Tejas Kamat diabetes claim
World Diabetes Day: 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जाणारा डायबेटीस! एक गंभीर आरोग्य समस्या आणि उपाययोजना

त्यांनी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नित्य व्यायाम व संतुलित आहार घेतला, तर मधुमेह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. यासाठी प्रत्येकाने साखरेचे पदार्थ, गूळ, मध, मैदा, जास्त गोड फळे खाणे टाळावे असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com