मोपा विमानतळावर अधिकाऱ्याला मारहाण, दोघांना अटक, उसगावात आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News: गोव्यात दिवसभर विविध क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.
Goa Today's News Live: मोपा विमानतळावर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

इंजिनीअर, कंत्राटदारांवरील कारवाईचे ढवळीकरांकडून समर्थन!

खराब रस्त्यांबाबत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांचा इंजिनिअर आणि कंत्राटदारांवरचा कारवाईचा इशारा योग्य.मुख्यमंत्री जो निर्णय घेतात त्याला मंत्र्यांनी पाठींबा देणे गरजेचे. माजी पीडब्ल्युडी मंत्री आणि विद्यमान वीज मंत्री ढवळीकरांचे प्रतिपादन.

जीईसीकडून Safety Helmet & Safety Watch Demo

जीईसीचे प्राध्यापक आणि दोन विद्यार्थ्यांकडून लाईनमॅनसाठी Safety Helmet & Safety Watch तयार‌. यामुळे जिवंत वीज वाहिन्यांची माहिती लाईनमॅनला मिळणार‌. याचे प्रात्यक्षिक (Demo) वीज मंत्र्यांसमोर सादर.

मोपा विमानतळावर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

मोपा विमानतळावर पीएसआय स्वप्नील किनळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी सिद्धेश नारुळकर आणि समिल महाले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली, त्यावेळी किनळकर दलालीचे काम सांभाळत होते. LPSI शशांक परब यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

भाजपचे मंत्री म्हणजे पक्ष नव्हे; प्रदेशाध्यक्ष तानावडे

भाजपचे मंत्री म्हणजे भाजप पक्ष नव्हे. दक्षिणेत भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्विकारतो. २०२७मध्ये भाजप सत्तेत येणार हे आज मी स्विकारतो. कोणी 'मुंगेरीलाल के सपने' अजिबात पाहू नयेत. सदानंद शेट तानावडेंचे प्रतिपादन.

माझा अनुभव कामाला येईल! सुलक्षणा सावंत

यापुर्वीही मला इतर राज्यांमध्ये निवडणूकीचे काम करण्याचा अनुभव आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवताना महाराष्ट्रात युती सरकार सत्तेत आणण्यासाठी काम करणार. सुलक्षणा सावंतांचे प्रतिपादन.

हिवाळी अधिवेशनात ST Political Reservation विधेयक संमत होणार; तानावडेंना विश्वास

राज्यसभेत अधिवेशनात मी 90 प्रश्न उपस्थित केले होते पैकी 30 प्रश्नांची उत्तरे मिळाली. 90 टक्के प्रश्न हे गोव्याची संबंधीत वेगवेगळ्या विषयांवर होते. कामकाज तहकूब झाल्याने ST Political Reservation संमत झाले नाही ते हिवाळी अधिवेशनात होईल. खासदार सदानंद शेट तानावडेंचा दावा.

Ponda Fire: उसगाव येथे वर्कशॉपला आग, टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

उसगाव येथे वर्कशॉपला लागलेल्या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाला आहे. अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण. आगीचे कारण अस्पष्ट.

Hill Cutting: धारबांदोडा डोंगर कापणी प्रकरण, दोघांविरोधात गुन्हा नोंद

धारबांदोडा बेतूल प्रतापनगर डोंगर कापणी आणि झाडांच्या कत्तली प्रकरणी समीर आनंद वाचासुंदर (पर्वरी) आणि दुलैय डोंगर कापणी आणि झाडांच्या कत्तली प्रकरणी मनोहर घनश्याम गांवकर (दांवकोण) यांच्यावर गुन्हा नोंद. ज्यांनी जमिनीचे प्लॉट विकत घेतलेत त्यांच्यावरही गुन्हे नोंद होण्याची शक्यता.

पणजीतील फिश मार्केट जमीनदोस्त होणार, दुकानदारांना नोटीस

पणजीतील फिश मार्केट जमीनदोस्त होणार. पणजी महानगर पालिकेकडून दुकानदारांना नोटीस. जागा दिली तर दुसरीकडे स्थलांतर करणार अन्यथा कुठे जायचं? दुकानदारांचा पालिकेला प्रश्न.

Goa Today's News Live: मोपा विमानतळावर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
Goa Contest: तू खींच मेरी फोटो! गोवा सरकारने जाहीर केली स्पर्धा; विजेत्याला तब्बल 20 हजारांचे बक्षीस; असे व्हा सहभागी

Panaji Traffic: पणजी बसस्थानक ते जुने सचिवालयपर्यंत वाहतूक कोंडी

जुने सचिवालय येथे स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असल्याने पणजी बसस्थानक ते जुने सचिवालयापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मिरामारच्या दिशेने जाणारी वाहतूक पणजी चर्च रोडने वळविण्यात आली आहे.

Dabolim Airport: दाबोळीवरुन उड्डाण करताना विमानाला पक्षी धडकला, उड्डाण रद्द

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करताना मुंबईला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकला. इंजिनमधून धूर येऊ लागल्याने उड्डाण रद्द. सकाळी 6.55 वा. घडली घटना.

Hill Cutting: धारबांदोडा तालुक्यात डोंगरकापणी सुरुच, तिसरे प्रकरण उघडकीस

धारबांदोडा पोलिस जंक्शन येथे डोंगरकापणी, झाडांची कत्तल. रस्ता तयार करुन प्लॉट विक्री. दोनच कि.मी अंतरावर सर्व खात्याचे अधिकारी असताना डोंगरकापणी करुन प्लॉट विक्री कशी होते? प्रशासन आतातरी जागे होणार का? नागरिकांचा सवाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com