Goa CM प्रमोद सावंत, TCP मंत्री राणेंचा गोव्यात Real Estate धंदा, काँग्रसेच्या पाटकरांचा घणाघात; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's Breaking News Live Update: गोव्यातील गुन्हे, राजकारण, मान्सून, कला क्रीडा संस्कृती यासह दिवसभरात घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
Goa Today News Live: मुख्यमंत्री, मंत्री राणेंचा गोव्यात Real Estate धंदा, पाटकरांचा घणाघात
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

चोपडेत लोकवस्तीच्या १३६ टक्के जमीन रुपांतरण!

पेडणेतील चोपडे गावात १७ (२) च्या माध्यमातून ३ लाख जमीनीचे (लोकवस्तीच्या १३६ टक्के) रुपांतरण. ह्या सगळ्या जमिनी परप्रांतीय कंपनी मालकांच्या आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा आरोप.

मुख्यमंत्री, मंत्री राणेंचा गोव्यात Real Estate धंदा,पाटकरांचा घणाघात

वनमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जमीन रुपांतरणावरुन लोकांची दिशाभूल करत आहेत‌. एकामेकांकडे बोटे दाखवत गोवा रिएल इस्टेटच्या घशात घालून गोवेकरांना त्रासात घालण्याचे दोघांचे काम सुरु आहे‌.

मांडवी नदीच्या पात्रात तरंगत्या मृतदेहाचे गूढ, शोधमोहीम अद्याप सुरुच

सावई वेरे ते वळवई भागातील मांडवी नदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची चर्चा. परवा आंबेशी - गांजे पुलावरून नदी पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह असल्याची शक्यता. अग्निशमन दलाने वळवई फेरी धक्क्यापासून वेरेपर्यंत नदीपात्रात शोध घेतला.

मात्र मृतदेह आढळला नाही. सदर बेपत्ता महिलेचे कुटुंबीयही वळवईत दाखल. संध्याकाळी पुन्हा शोधमोहीम राबवणार अशी अग्निशमन दलातील सूत्रांची माहिती.

केपेत गणेश उत्सवाच्या निमित्ताने उभारेला मंडप कोसळला

केपे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेला एका बाजूचा रस्त्यावरचा मंडप खाली कोसळला, सुदैवाने कोणतीही मोठी हानी नाही.

वाळपई भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित, चतुर्थी बाजारावर परिणाम

वाळपई भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचा चतुर्थी बाजारावर देखील परिणाम झाला आहे.

Goa Murder Case: अहमद देवडी हत्या प्रकरण; नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

म्हापसा पोलिसांकडून अहमद देवडीच्या हत्येप्रकरणी नऊ जणांविरुद्ध 647 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा Cyber Attack चे बळी, फेक Instagram account तयार

हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांचे अज्ञाताकडून फेक Instagram account तयार. याबाबतची माहिती आमदारांनी आपल्या सोशल मीडिया aacount वरून दिली आहे. या फेक account वरून आलेली request accept करू नका. अज्ञाताविरुद्ध सायबर क्राईम मध्ये गुन्हा नोंद.

Land Grabbing Case: सरकारी जमिनी हडप केल्यास खबरदार; मुख्यमंत्री सावंत यांचा सज्जड इशारा

सरकारी जमिनी हडप केल्यास खबरदार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारी जमिनींवर चांगले प्रकल्प आणण्याचा सरकारचा मानस. जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन.

वेळुस नदीत उडी घेवून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळला

शुक्रवारी संध्याकाळी वेळुस पुलावरुन नदीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या होमगार्ड प्रशांत केरकर (35, नगरगाव, सत्तरी) यांचा मृतदेह दाबोस म्हादई नदीत आढळला. वाळपई अग्निशमन दलातर्फे अथक परिश्रमाने मृतदेह पाण्यातुन काढण्यास यश.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com