Goa Today's Update: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Goa Today's Update 14 March 2024: गोव्यातील दिवसभरात घडणाऱ्या ठळक आणि महत्वाच्या घडमोडींचा आढावा.
Goa Today's Live Update 14 March 2024|Goa Marathi News | Latest Breakings
Goa Today's Live Update 14 March 2024|Goa Marathi News | Latest Breakings Dainik Gomantak
Published on
Updated on

धक्कादायक! सुलभ शोचालायाचे पाणी थेट कोलवा खाडीत

सुलभ शोचालायाचे सांडपाणी कोलवा खाडीमध्ये सोडल्याप्रकरणी कोलवा पंचायतीने पर्यटन विभागाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

टीएमसीच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

लोकसभा- विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्त

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील 'एक देश, एक निवडणूक' समितीनं देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तसंच त्यानंतर 60 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे.

याविषयीचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज सादर करण्यात आला. या अहवालात एकत्रित मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एकत्रित निवडणूका घेण्यासाठी काही घटना दुरुस्त्या कराव्या लागतील, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

बिग डॅडी कॅसिनोच्या बनावट एंट्री पास प्रकरणी तिघांना अटक

पणजी येथील बिग डॅडी कॅसिनो रिसेप्शनमध्ये असलेल्या चेतन किलकिले, निखिल फाळके, श्रीनिधी मांडवकर (सर्व रा. कोल्हापूर, महाराष्ट्र) यांनी कॅसिनोच्या पाहुण्यांना बनावट एंट्री पास देऊन प्रवेश शुल्काची रु.10,500/- रक्कम घेऊन पळ काढला.

या प्रकरणी पोलीस पथकाने कोल्हापूर येथे कारवाई करत स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीने वरील तीनही आरोपींना कोल्हापूर येथे अटक करून पणजी पोलीस ठाण्यात आणून वरील प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल केलाय.

31 मेच्या अंतिम मुदतीनुसार स्मार्टसिटीचे काम पूर्ण होईल- CM सावंत

सध्या पणजी स्मार्ट सिटीची कामे जलद गतीने मार्गी लागत आहेत. 31 मेच्या अंतिम मुदतीनुसार स्मार्टसिटीचे काम पूर्ण होईल असा आम्हाला अंदाज आहे . याकामी 4-5 दिवसांचा विलंब होऊ शकतो मात्र कामगारांची संख्या वाढवून हे काम पूर्ण करण्यावर भर आहे- मुख्यमंत्री सावंत

मयेतील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला प्रारंभ, उत्सवावर वादाचे सावट

मयेतील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला प्रारंभ. मात्र उत्सवावर वादाचे सावट. पोलिस बंदोबस्तात कळस मंदिराबाहेर. केळबाय मंदिरात मात्र प्रवेश रोखला. उपजिल्हाधिकारी आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.

Dainik Gomantak

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार सागर शिरोडकर अटकेत

Colvale Police

उदय चोडणकर यांना 12 मार्च रोजी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सागर शिरोडकर (रा. थिवी) याच्याविरोधात कोळवाळ पोलिसांकडून गुन्हा नोंद.

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सागरला तडीपारचे आदेश दिले होते. तडीपार आदेशाचे उल्लंघन करत गुन्हा केल्याने त्याला अटक. सागरवर विविध पोलिस स्थानकात 18 फौजदारी गुन्हे नोंद आहेत.

Colvale Police
Colvale PoliceDainik Gomantak

आरजीचे खासदार निवडून आल्यावर इंडिया आघाडीला पाठिंबा - मनोज परब

गोव्यात रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे खासदार निवडून आल्यावर इंडिया आघाडीला पाठिंबा देतील, असे पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी स्पष्ट केले आहे. मनोज परब लोकसभा स्वबळावर निवडण्याचा निर्णय घेतला आहे.

RG
RGDainik Gomantak

सातव्या वेतन आयोगाची मागणी; पणजीत पंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

Panjim, Goa

सातव्या वेतन आयोगाची मागणी करत पणजी येथील आझाद मैदानावर गोवा ग्रामपंचायत संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करून 40 दिवस उपोषण करण्याचा इशारा.

Panjim, Goa
Panjim, GoaDainik Gomantak

आठ वासरांचा मृत्यू, फोंडा पोलिसांत गुन्हा दाखल

गायीच्या आठ वासरांची योग्य काळजी न घेतल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी फोंडा पोलिसांत पिनाकिन हेमाचंद्र संसारे यांच्याविरोधात प्राणी क्रूरता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ओल्ड गोव्याच्या विकासासाठी किती पैसे खर्च केले, सार्दिन आणि काँग्रेसने जाहीर करावे मुख्यमंत्र्याचे आव्हान

Old Goa

मोदींनी कॅथलिक लोकांसोबत नाताळ साजरे केले, त्यांनी पोपला भेट देऊन त्यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण दिले. काँग्रेसने कॅथलिक लोकासाठी काय केले त्यांनी सांगावे.

मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ साली एक्स्पोझिशनसाठी ५० कोटी खर्च केले. आता २०२४ मध्ये भाजप सरकार देखील यासाठी पैसे खर्च करणार आहे. ओल्ड गोव्याच्या विकासासाठी किती पैसे खर्च केले, सार्दिन आणि काँग्रेसने जाहीर करावे असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विर्नोडा येथील कारचालक ताब्यात

बेदरकारपणे चारचाकी वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी नारायण मोरजकर (33, वळपे विर्नोडा पेडणे) कोलवाळ पोलिसांच्या ताब्यात, तक्रारदार दुचाकीचालक आनंद आगरवाडेकर (57, शिवोली) व दुचाकीस्वार दिलदार साबजी जखमी.

कळंगुटच्या 'त्या' लेनमध्ये गेल्यावर थायलंडमध्ये आल्यासारखे वाटले- ब्रह्मेशानंद आचार्य

Calangute Goa

अध्यात्मिक गुरू प.पू.सद्गुरुदेव ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांनी कळंगुट समुद्रकिनारी भेट दिल्यावेळीचा त्यांचा कटू अनुभव कथन केला. कळंगुटच्या त्या लेनमध्ये गेल्यावर थायलंडमध्ये आल्यासारखे वाटले, असे ब्रह्मेशानंद आचार्य म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com