बेतोडा गोळीबार प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गोळीबार प्रकरणाचा फोंडा पोलिसांनी तातडीनं तपास करत अवघ्या 24 तासांत संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या
बेतोडा गोळीबार प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले पिस्तुल पोलिसांनी आर्ल-केरी येथून केले हस्तगत. जानेवारीत शिजला होता सचिनला मारण्याचा कट.
रेंट अ कॅब चोरी प्रकरणी वास्को पोलिसांनी आदेश कुमार राजेंद्र कुमार (वय 30 वर्ष, रा. हरियाणा) आणि मनोज मुल विशन सिंग (वय 29 वर्ष, रा. हरियाणा) या दोघांना शिर्डी येथे पकडत त्याच्यावर आयपीसी सेक्शन 406 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून बलेनो कार जप्त करण्यात आलीय.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत दाखल झाले असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. शहांसोबत सायंकाळी उशिरा बैठक होणार असल्याची माहिती आहे.
मागील १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या योजना नाव बदलून नव्याने जाहीर केल्या.मेक इन इंडिया, स्कील इंडिया, जनधन योजना ही फक्त नवी नावे त्यांनी योजनेला दिलीत ज्या मूळ कॉंग्रेसच्या योजना. पंतप्रधान नरेंद मोदी सपशेल अपयशी. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची टीका.
काँग्रेसने दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला द्यावी हे आपण सांगू शकत नाही. मात्र कोणाला उमेदवारी दिल्यास कांय वाईट घडू शकत हे मी काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांना सांगितल आहे. काँग्रेसने सार्दीन यांना दक्षिण गोव्याची उमेदवारी दिल्यास मला मान्य नाही ह्या भुमिकेवर आपण ठाम.
भाजप जर महिलांना उमेदवारी देत असेल तर चांगली गोष्ट. पण पुरुष उमेदवारावर एकमत होत नसल्याने महिलांचा विचार होत असेल तर ते चुकीच. काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंना भेटल्यानंतर विजय सरदेसाईंनी स्पष्ट केली आपली भूमिका.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची पणजीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील ही पहिलीच बैठक आहे.
बेतोडा गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी देवदास राधाकृष्ण मसुरकर (47) याला अटक केल्यानंतर आणखी दोघांना अटक. प्रविण कुमार प्राजू पासवान (22) आणि प्रभात प्राजू पासवान (25) (दोघेही रा. बेतोडा, फोंडा मूळ बिहार) यांना फोंडा पोलिसांकडून अटक. दोघेही बेतोडा येथे भाड्याच्या जागेत राहतात.
म्हापसा बाजारपेठमध्ये पाण्याची जलवाहिनी फुटल्याने येथील अधिकतर गटारे तुंबली. परिणामी अंतर्गत रस्त्यांना तळ्याचे रूप. व्यापारी वर्गाकडून संताप व्यक्त.
गवाणे सत्तरी येथे स्कूटर आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला असून यात स्थानिक सदा घोलकर हा किरकोळ जखमी तर परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाला आहे.
बेतोडा येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित आरोपी देवदास राधाकृष्ण मसुरकर (47, रा. शांतीनगर, फोंडा) अटक करण्यात आली आहे. गोळीबारात सचिन कुर्टीकर (32) गंभीर जखमी झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.