Goa Today's Live News Update 02 March 2024: दिवसभरातील ठळक घडामोडीं वाचा एका क्लिकवर

Goa Today's Live News Update 02 March 2024: राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील ठळक घडामोडी.
Goa Today's Live News Update 02 March 2024
Goa Today's Live News Update 02 March 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

हडफडेत चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; हणजूण पोलिसांची मोठी कामगिरी

हणजूण पोलिसांनी हडफडे येथे चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा केला पर्दाफाश. मुलींना संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचवताना रॅकेटमधील दोघे पोलिसांच्या ताब्यात. दोघा मुलींची सुटका, प्रकरणाचा पुढील तपास सुरु.

मुरगाव बंदरातील CISF शिपायाची आत्महत्या

मुरगाव बंदरात सुरक्षा रक्षकांची सेवा बजावणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) शिपायाची आत्महत्या. मूंगुलू बेहरा (वय ३२, ओडिसा)

सडा येथील सीआयएसएफच्या वसाहतीच्या बॅरेकमध्ये गळफास घेत केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

श्रीपाद भाऊच उत्तर गोव्यातून भाजपचे अधिकृत उमेदवार

Goa Loksabha BJP Candidate

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिले यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने 16 राज्यातील 195 नावांची यादी जाहीर करण्यात आली.

उत्तर गोव्यातून भाजपने विद्यमान खासदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दिल्लीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

दोन्ही पात्रांव म्हण्टा गोव्यात तिसरे विमानतळ आवश्यक!

दोबोळी विमानतळ बंद होणार अशी भिती व्यक्त केली जात असताना दोन दिवसांपुर्वी मंत्री रवी नाईकांनी गोव्यात तिसऱ्या विमानतळाची आवश्यकता बोलून दाखवली होती.

आता रवी यांच्यापाठोपाठ मंत्री सुदिन ढवळीकारांनीही पुढल्या 10 वर्षात तिसऱ्या विमानतळाची गरज बोलून दिखवलीय. कदाचीत तिसऱ्या विमानतळाची मागणी काणकोणात होई शकते असे भाकितही ढवळीकरांनी केले आहे.

पुन्हा रेंट कार, पुन्हा हिट अँड रन; खोर्ली - म्हापशात अपघात

Khorlim Mapusa Accident

घाटेश्वर, खोर्ली येथे रेंट कारची दुचाकीला धडक. अपघातानंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचा पाठलाग करुन स्थानिकांनी चालकाला केले पोलिसांच्या स्वाधीन. कार चालक मद्याच्या नशेत असल्याचे उघड.

काही दिवसांपूर्वी मांडवी पुलावर रेंट कारच्या धडकेत, नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला होता.

Khorlim Mapusa Accident
Khorlim Mapusa Accident

ढवळीकर आणि आरजी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक, अंगावर जाण्याचा प्रकार!

Panchayat Chalo

सरकारच्या 'पंचायत चलो' अभियानाअंतर्गत मडकई मतदारसंघात मंत्री विश्वजीत राणे यांच्या दौऱ्यावेळी आरजीचे कार्यकर्ते आणि सुदीन ढवळीकर आमनेसामने. काही काळ तणावाचे वातावरण.

मंत्री विश्वजीत राणेंना टीसीपी कलम 39ए वरुन प्रश्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरजीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मंत्री सुदीन ढवळीकरांमध्ये उडाली शाब्दिक चकमक. एकामेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न. कार्यकर्त्यांनी रोखले.

दाबोळी विमानतळ परिसरात परप्रांतियांकडून सरकारी नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवसाय

दाबोळी विमानतळ परिसरात परप्रांतियांकडून सरकारी नियम धाब्यावर बसवून बिनधास्त व्यवसाय सुरू आहे. दाबोळी विमानतळ परिसरात निज गोयकारांना व्यवसाय करण्यापासून रोखले जाते तर परप्रांतियांना व्यवसाय करण्यास संबंधित विभाग बेकायदेशीर परवानगी देत आहे.

सदर परप्रांतियांनी दाबोळी विमानतळ बाहेरील राष्ट्रीय मार्गावर व्यवसाय करीत असल्याने विमानतळावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परप्रांतियांनी थाटलेल्या बेकायदेशीर व्यवसायामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दाबोळी पोलिस व इतर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

2.71 लाख किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून एकाला अटक

2.71 लाख किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आनंद साळगावकर (40) याला मडगाव पोलिसांकडून अटक. 3.80 ग्रॅम एमडीएमए, 18 एक्स्टसी गोळ्या, 14.66 ग्रॅम चरस आणि 0.08 ग्रॅम एलएसडी मुद्देमालासह कार जप्त.

चर्चिल आणि वालांका आलेमाव यांचा दबाव; बाणावलीतील आरोग्य तपासणी शिबिर अचानक रद्द

बाणावली मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी आयोजित केलेले आरोग्य तपासणी शिबिर अचानक रद्द करण्यात आले. चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांक यांनी दबाव निर्माण करुन हे शिबिर रद्द केल्याचा आरोप वॉरन यांनी केला.

चर्चिल आणि वालांका यांनी मणिपाल रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

आरोग्य तपासणी अचानक रद्द झाल्याने बाणावलीमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, मतदारसंघातील वॉरन यांची वाढती प्रसिद्धी आरोग्य तपासणी शिबिर रद्द करण्याचे कारण असू शकते असाही दावा स्थानिकांनी केला.

खड्डे, केपे येथे दोन ट्रकमध्ये अपघात, एक जागीच ठार

खड्डे, केपे येथे दोन ट्रकमध्ये रात्री उशीरा झालेल्या अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर एक तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com